सावद्याचे राजेंद्र चौधरी यांचे नगरसेवक पद कायम; नगरविकास विभागाची तात्पुरती स्थगित
सावद्याचे राजेंद्र चौधरी यांचे नगरसेवक पद कायम; नगरविकास विभागाची तात्पुरती स्थगित
सावदा प्रतिनिधी:- येथील नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान अपक्ष नगरसेवक राजेंद्र श्रीकांत चौधरी यांनी व त्यांच्या पत्नी नगराध्यक्ष असताना पदाचा दुरुपयोग करीत स्वतःच्या घरासाठी वाढी घरपट्टी लागू न करता जुन्या कायद्याप्रमाणेच घरपट्टी लावून ठेवल्याने त्यांना जिल्हाधिकारी यांनी त्यांना अपात्र ठरविले होते . याविरोधात राजेंद्र चौधरी नगर विकास राज्य मंत्री यांच्याकडे अपील केले असता त्यांच्या अपात्रतेस ' तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त सावदा तालुका रावेर येथील माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक राजेंद्र श्रीकांत चौधरी यांना मालमत्ता करात फेरफार केल्या प्रकरणी दाखल तक्रारअर्जानुसार झालेल्या सुनावणीत दि ७ डिसेंबर ला अपात्र करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती.
माजी नगराध्यक्ष तथा अपक्ष नगरसेवक राजेंद्र चौधरी यांचे विरुद्ध येथील सत्ताधारी भाजप पक्षाचे गटनेते नगरसेवक अजय भारंबे यांनी दाखल केलेल्या एका तक्रार अर्जावर जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी निकाल देताना राजेंद्र चौधरी यांना नगरसेवकपदी अपात्र घोषित केले होते,
नगरसेवक अजय भागवत भारंबे यांनी दि ६ फेब्रुवारी २०२० रोजी एक तक्रार अर्ज माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान अपक्ष नगरसेवक राजेंद्र चौधरी यांचे विरुद्ध तक्रार अर्ज दाखल केला होता यात चौधरी यांनी सन २००१ ते आज पावेतो ते स्वत: नगरसेवक असून त्यांनी त्यांच्या पत्नी या सुद्धा नगरसेविका होत्या . सन २००६ ते सन २०११ पर्यंत नगराध्यक्षा देखील होत्या या काळात चौधरी यांनी आपले स्वताचे कुटुंबातील घराचे मालमत्ताकर कमी करण्यासाठी पालिकेचे मालमत्ता कर रजिस्टर मध्ये फेरफार करून कुठलीही कादेशीर प्रक्रियेचा अवलंब न करता खाडाखोड करून कमी रकमेची आकारणी निर्धारित केली अशी तक्रार भारंबे यांनी केली होती,
या मालमत्तेत त्याचे आई सुमन श्रीकांत चौधरी, यांचे नावावरील मालमत्ता क्रमांक ४६१ याची सन २०११ मध्ये रेडीरेकनर नुसार १९०६ रुपये, एवढा कर निर्धारित केला होता तो ७३० रु एवढा केला, त्यांचे वडील श्रीकांत एकनाथ चौधरी यांचे नावावरील मालमत्ता क्रमांक २९ याचा कर २१६३ रु एवढा असताना तो ५८० एवढा कमी केला, तसेच दुसरी एक मालमत्ता क्रमांक १६३ याची सन २००६ ते २०११ पंचवार्षिक कालावधीत एकत्रित कराची रक्कम ४४७० रुपये आकारणी केली आहे, या सर्व बाबतीत अजय भारंबे यांनी तक्रार दाखल केली होती,
दरम्यान राजेंद्र चौधरी यांना देखील आपले म्हणणे सादर करण्यास सांगितले होते त्यांनी आपले म्हणणे सादर करताना सन २००६ ते २०११ हा कार्यकाळ संपलेला असताना व तक्रार चालू कार्यकाळातील कामकाज बाबतची नसल्याने व तक्रार सद्यस्थितीच्या कार्यकाळा बाबत नसल्याने आक्षेप चुकीचा असून सदर तक्रार खोट्या माहितीच्या आधारे दाखल केल्याचे म्हटले होते,
दरम्यान जळगांव जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दि ७ रोजी याबाबत निर्णय देताना सदर नगरसेवक राजेंद्र चौधरी यांना अपात्र करीत असल्याचा निर्णय दिला, दरम्यान या निर्णयाने सावदा येथील राजकाणात एकच खळबळ उडाली होती,
तर या निर्णया विरोधात राजेंद्र चौधरी काय पवित्रा घेतात याकडे सर्व सावदावासीय नागरिकांचे लक्ष लागले होते या आपत्रते विरुद्ध १५ दिवसात अपील राज्य शासनाच्या नगरविकास राज्य मंत्री यांचे कडे सादर करण्याची मुदत होती .त्यास चौधरी यांनी राज्य शासनाच्या नगरविकास खात्याकडे अपील दाखल केले होते त्या नुसार नगरविकास विभागाचे कक्ष अधिकारी प्रवीण पाटील यांच्या तात्पुरत्या स्थगितीचे पत्र दि १४ रोजी निर्गमित करण्यात आले.त्यांच्या नगरसेवक पदासाठी दिलासा मिळाला आहे.स्थगितीच्या निर्णयाचे शहरात फटाके फोडून जल्लोष करण्यात आला तर नागरिकांनी त्यांचे अभिनंदन केले
राजेंद्र चौधरी यांनी राज्य शासनाच्या नगरविकास विभागाकडे कडे अपील केले होते या अपिलानुसार नगर विकास विभागाचे कडून ७ डिसेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशास तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे . नगर विकास राज्य मंत्री यांच्याकडून पुढील सुनावणी करिता दिनांक व वेळ प्राप्त झाल्यानंतर सुनावणी घेण्यात येणार असल्याचे कळविण्यात आले आहे .
याबाबत राजेंद्र चौधरी यांनी भगवान के घर देर है अंधेर नही माझे राजकीय आयुष्याची सुरुवात संघा मधून झाली आहे अगदी संघर्ष सुरू आहे भविष्यात सुरूच राहील पद असो अगर नसो जनतेची काम करतच राहणार सत्य परेशान होत आहे पराजित नाही अशी भावना चौधरी यांनी व्यक्त केली आहे .

कोणत्याही टिप्पण्या नाहीत