Contact Banner

जळगाव जिल्ह्यात आज २४ कोरोना रुग्ण बाधित


 जळगाव जिल्ह्यात आज २४ कोरोना रुग्ण बाधित

(जळगाव प्रतिनिधी): आज १३ डिसेंबर २०२० च्या माहिती कार्यालयाच्या प्रेस नोट नुसार   रात्री ६.२५ वाजता मिळालेल्या शासकीय माहिती नुसार . 

           जिल्ह्यात आज दिवसभरात ३५ रूग्ण उपचारात   बरे  होऊन घरी गेले . जिल्ह्यात आतापर्यंत  उपचार घेऊन बरे  होऊन सुखरूप घरी गेलेले रुग्णांची संख्या ५३३७२ आहे . जिल्ह्यात सध्या ३९४ रूग्ण उपचार घेत असून  आज दिवसभरात २४ नवीन  बाधित रूग्ण आढळल्याने  एकूण बाधितांची संख्या ५५०५९ झाली असून आज  पर्यंत १३१३ रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे . 


जळगांव शहर शंभराच्या आत:-

जिल्हा प्रशासनाने दिलेल्या   माहिती  नुसार जिल्ह्यात आज २४  रूग्ण बाधित आढळून आले आहेत . यात  जळगाव शहरातील १० आहेत. 


असे आढळले रुग्ण:-


तालुका निहाय बाधित रुग्णाची  आकडेवारी  जळगांव ग्रामिण ०१, भुसावळ ०६, अमळनेर ०१ , चोपडा ०३ ,पाचोरा ०० , भडगाव  ००,धरणगाव ००, यावल ०० , एरंडोल ००, जामनेर ००, रावेर ००,पारोळा ०२,चाळीसगांव ००, मुक्ताईनगर ००, बोदवड ००,इतर जिल्ह्यातील ००असे रुग्ण बाधित आढळून आले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.