जळगाव जिल्ह्यात आज ६० कोरोना रुग्ण बाधित
जळगाव जिल्ह्यात आज ६० कोरोना रुग्ण बाधित
(जळगाव प्रतिनिधी): आज ३१ डिसेंबर २०२० च्या माहिती कार्यालयाच्या प्रेस नोट नुसार रात्री ६.३८ वाजता मिळालेल्या शासकीय माहिती नुसार .
जिल्ह्यात आज दिवसभरात ४४ रूग्ण उपचारात बरे होऊन घरी गेले . जिल्ह्यात आतापर्यंत उपचार घेऊन बरे होऊन सुखरूप घरी गेलेले रुग्णांची संख्या ५४०७८ आहे . जिल्ह्यात सध्या ४४८ रूग्ण उपचार घेत असून आज दिवसभरात ६० नवीन बाधित रूग्ण आढळल्याने एकूण बाधितांची संख्या ५५८५५ झाली असून आज पर्यंत १३२९ रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे .
जळगांव शहर शंभराच्या आत:-
जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहिती नुसार जिल्ह्यात आज ६० रूग्ण बाधित आढळून आले आहेत . यात जळगाव शहरातील १० आहेत.
असे आढळले रुग्ण:-
तालुका निहाय बाधित रुग्णाची आकडेवारी जळगांव ग्रामिण ०० , भुसावळ ०८, अमळनेर ०३ , चोपडा ०१७ ,पाचोरा ०६ , भडगाव ००,धरणगाव ००, यावल ०१, एरंडोल ००, जामनेर ०४, रावेर ०२,पारोळा ००,चाळीसगांव ००, मुक्ताईनगर ०८, बोदवड ००,इतर जिल्ह्यातील ०१ असे रुग्ण बाधित आढळून आले आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत