नवजात बालक सापडले काटेरी झुडपात;रावेर येथे घडली मानवतेेला काळिमा फासणारी घटना
नवजात बालक सापडले काटेरी झुडपात;रावेर येथे घडली मानवतेेला काळिमा फासणारी घटना
रावेर प्रतिनिधी - शहरातील जुना सरकारी हॉस्पिटलच्या मागे काटेरी झुडपांमध्ये बेवारस स्थितीमध्ये पुरुष जातीचे नवजात बालक मिळून आले आहे.
या नवजात चिमुकल्या बाळाला मरणाच्या दाढेत सोडून देणाऱ्या निर्दयी पालकांचा अजूनही तपास लागलेला नाही. लोक मुलांसाठी देवाकडे नवस करणाऱ्या अशा असंख्य महिला या जगामध्ये आहेत पण रावेरमध्ये अशी ही धक्कादायक घटना ऐकून तालुका हादरला आहे सदरील बालकास जळगाव येथील जिल्हा रुग्णालयात मध्ये उपचारासाठी रवाना करण्यात आले आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत