Contact Banner

पाकिस्तानात दरवर्षी एक हजार अल्पसंख्याक महिलांचे धर्मांतर

 

पाकिस्तानात दरवर्षी एक हजार अल्पसंख्याक महिलांचे धर्मांतर

वृत्त नवी दिल्ली:- पाकिस्तानात दरवर्षी अल्पसंख्यांक समुदायाच्या एक हजाराहून जास्त मुलींचे अपहरण व बळजबरी धर्मांतर करून मुस्लीम बनवले जात आहे पाकिस्तानच्या मानवी हक्क कार्यकर्त्यांच्या हवाल्याने ही माहिती देण्यात आली आहे. इस्लामाबाद येथील महिला हक्क संघटना, औरत फाउंडेशन, अनप्रेझेंटेड and पीपल्स ऑर्गनायझेशन (यूएनपीओ) व मुव्हमेंट फ़ॉर सॉलिडरिटी अँड पीस इत्यादी एनजीओने वेगवेगळे अहवाल व अभ्यासाच्या आधारे हा अंदाज लावला आहे त्याशिवाय अमेरिकेच्या वृत्तसंस्थेने पाकिस्तानात अल्पसंख्यांकांना मुलीचे बळजबरी विवाह केल्याच्या घटनांचा तपशील दिला आहे स्वयंसेवी संस्था रिस्पॉन्सिबल फोर इक्वलिटी अंट लिबर्टी चा आहे. पाकिस्तानात दर महिन्याला वीस ते पंचवीस हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर होते जागतिक सिंधी काँग्रेसच्या म्हणण्यानुसार सिंघम मध्ये बळजबरी धर्मांतरासाठी सर्वाधिक कमकुवत क्षेत्र (उमरकोट थारपारकर, मीरपूर) घोटकी आणि जकोबाबाद आहे. वेठबिगारी व बळजबरी विवाह या माध्यमातून बहुतांशी अल्पसंख्यांकांना धर्मांतर करायला लावले जाते सिंघम मध्ये बहुतांश बिगारी हिंदू अल्पसंख्यांक आहेत कर्जामुळे ते गुलाम बनलेले आहेत अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने या महिन्यात पाकिस्तानातील धार्मिक स्वातंत्र्य संबंधीचा अहवाल जाहीर केला त्यात पाकिस्तानचा चिंता निर्माण करणाऱ्या देशाच्या श्रेणीत समावेश केला आहे परंतु पाकिस्तानच्या सरकारने हे आरोप नेहमीच नाकारले आहेत हिंदू शीख किंवा ख्रिश्चन मुली किंवा महिलांच्या बळजबरी धर्मांतर केल्याच्या घटना आहेत तत्पूर्वी त्यांचे अपहरण करण्यात आल्याच्या घटनांचे या अहवालाला विश्लेषण आहे असा प्रकरणात पोलिसांचे वर्तन खराब मानले जाते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.