रेल्वे रुळावर मृतदेह. घातपाताचा संशय?
रेल्वे रुळावर मृतदेह. घातपाताचा संशय?
नशिराबाद-जळगाव तालुक्यातील नशिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या ओरियंट सिमेंटच्या कारखान्या जवळ असणाऱ्या रेल्वे रूळांवर आज पहाटे ६ वाजेच्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आलेला आहे. या व्यक्तीच्या फाटलेल्या कपड्यांवरून प्रथमदर्शनी या व्यक्तीचा घातपात झालेला असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सदरील मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव येथे शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आलेला असून या संदर्भात नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे.
दरम्यान ,या मृत व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नसून नशिराबाद पोलिसांनी ओरियंट सिमेंट कारखाना प्रशासन व परिसरात याबाबत चौकशी सुरू केलेली आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत