Contact Banner

सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा ४ मे पासून

 

सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा ४ मे पासून

नवी दिल्ली  वृत्त संस्था३१ डिसेंबर -सीबीएसई बोर्डच्या दहावी , बारावीच्या परीक्षा ४ मे पासून घेण्यात ही येणार असून , त्या १० जूनपर्यंत  चालतील , अशी घोषणा केद्रीय ना शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यानी गुरुवारी आभासी सत्रात ता केली . या परीक्षांचे निकाल १५ जुलै पर्यंत जाहीर होणार असल्याचे  त्यांनी सांगितले . 

     सीबीएसई दहावी आणि बारावी परीक्षेच्या तारखाची घोषणा ३१ डिसेंबर रोजी करण्यात येतील , असे निशंक यानी आधीच जाहीर केले होते . त्यानुसार आज परीक्षाची तारीख जाहीर करण्यात आली . प्रात्यक्षिक परीक्षा १ मार्चपासून सुरू होतील , असे त्यांनी सांगितले शाळांतर्फे प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात येतील . मात्र , जाहीर केलेल्या तारखेनुसारच त्या घ्याव्या लागणार आहेत , असे ते म्हणाले . विशेष म्हणजे , विद्यार्थ्यांना या परीक्षांकरिता तयार करण्यासाठी बहुतांश शाळांनी आधीच आभासी माध्यमातून परीक्षा घेणे सुरू केले आहे .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.