सावदा विभागात वीजचोरी रोखण्यासह वसुलीसाठी मोहीम सुरू
सावदा विभागात वीजचोरी रोखण्यासह वसुलीसाठी मोहीम सुरू
सावदा प्रतिनिधी- वीज महावितरण कंपनीच्या सावदा विभागांतर्गत यावल व रावेर तालुक्यात प्रत्येक गावात विजेची चोरी व थकीत वीज बिलाच्या वसुलीसाठी मोहीम राबवण्यास सुरुवात झाली . सावदा विभागाचे कार्यकारी अभियंता गोरक्षनाथ सपकाळे यांनी सर्व उपविभाग अधिकाऱ्यांना या संदर्भात सूचना दिल्या आहेत . कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यापासून अविरत वीज पुरवठा केल्यामुळे ग्राहकांना समाधान आहे . थकबाकीचे प्रमाण वाढले आहे ते कमी करण्यासाठी या काळात वीज चोरीवर नियंत्रणासाठी मोहीम राबवता आली नाही . त्या मुळे आता सावदा विभागाने मोहिमेला सुरुवात केली आहे . त्या अंतर्गत ग्राहकांची तपासणी करण्यात येत आहे . कमी वीज वापर करणारे आणि मोठे वीज ग्राहक यांची तपासणी करण्यात येत आहे . विभागांतर्गत येणाऱ्या सर्वच गावांमध्ये ही मोहीम राबवली जात आहे . यावल व रावेर तालुक्यातील सर्व उपविभागीय अधिकाऱ्यांना कार्यकारी अभियंता गोरक्षनाथ सपकाळे यांनी याबाबत सूचना दिल्या तसेच मोहीम राबवण्याबाबत मार्गदर्शन केले . तसेच सर्व वीज ग्राहकांनाही थकीत वीज बिल भरणा करण्याचे आवाहन केले . थकबाकीदारांवर आगामी काळात कारवाई होणार आहे . त्यामुळे कारवाई टाळण्यासाठी थकबाकीचा वेळीच भरणा करावा , असे आवाहन केले आहे .

कोणत्याही टिप्पण्या नाहीत