Contact Banner

सावद्याची चंपाषष्ठीला होणारी खंडेराव महाराज यात्रा कोरोना मुळे रद्द

 


सावद्याची चंपाषष्ठीला होणारी खंडेराव महाराज यात्रा कोरोना मुळे रद्द 

सावदा ( प्रतिनिधी ) सावदा तालुका रावेर  येथील दरवर्षी मार्गशीर्ष महिन्याच्या  चंपाषष्ठी ला होणारी  खंडेराव महाराज यांची  यात्रा वर्षी कोरोना महामारी मुळे रद्द करण्यात आली आहे .

       येथील जागृत देवस्थान खंडेराव महाराज मंदिर परिसरात दरवर्षी  मार्गशीर्ष महिन्याच्या चंपाषष्ठी ला यात्रा होत असते  मात्र यंदा कोरोना महामारीचे  संकट व आरोग्य च्या दृष्टीने दिनांक २० डिसेंबर रोज रविवार या दिवशी  होणारी यात्रा रद्द करण्यात येत आहे अशी माहिती भगत देवस्थान संस्थांचे प्रमुख अशोक सुपडू पवार व राहुल पवार यांनी काल झालेल्या बैठकीत जाहीर केले.

     खेळणी ,पाळणे, हॉटेल व्यावसायिकांनी कोणत्याही प्रकारचे दुकाने यात्रेच्या दिवशी  लावू नये असे आवाहन खंडेराव महाराज मंदिराचे अशोक पवार ( भगत ) व राहूल पवार यांनी केले आहे .

 तर मंदिर भाविक भक्त यांचे करिता दर्शनार्थ खुले राहील व पारंपरिक सकाळ आरती,थळी भरणे,पूजा इतर धार्मिक कार्यक्रम  मंदिरात भगत व पुजारी यांचे मार्फत कमी लोकांच्या उपस्थितीत शासकीय नियम पाळून पूर्ण केले जातील तरी मंदिरात दर्शनास येताना मास्क लावून व सनेटरेज वापरून सुरक्षित अंतर ठेवून यावे असे आवाहन करण्यात येत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.