श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स कंपनी तर्फे मयताच्या कुटुंबाला 28 लाखाची मदत. ब्राँच मॅनेजर मुकेश पाटील यांचे होत आहे जिल्ह्यात कौतुक.
श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स कंपनी तर्फे मयताच्या कुटुंबाला 28 लाखाची मदत.
ब्राँच मॅनेजर मुकेश पाटील यांचे होत आहे जिल्ह्यात कौतुक.
श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स कंपनीचे ग्राहक अश्फाक् खान गुलाम गौस खान रा.सावदा यांनी मागील पाच वर्षापासून श्रीराम फायनान्स च्या रावेर शाखेकडून त्यांच्या वाहनावर कर्ज घेतले होते. त्यासोबत कंपनीचे वेगवेगळे प्रकारचे वर्किंग कॅपिटल लोन सुद्धा त्यानी, वाहन व्यवस्थित चालावे याकरता वेळोवेळी घेतले होते , कंपनी मध्ये सर्व सुविधा उपलब्ध असल्यामुळे त्यांनी त्यांच्या वाहनावरील विमा देखील श्रीराम मधुनच नूतनीकरण करून घेतला होता. तसेच त्यांनी स्वतःच्या कुटुंबाचा विचार करून रुपये 14 लाख , श्रीराम लाइफ इन्शुरन्स पॉलिसी सुद्धा काढून घेतली होती. फेब्रुवारी महिन्यामध्ये त्यांचा अकस्मात अपघाती मृत्यू झाला .ही माहिती श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स कंपनीचे अधिकारी मुकेश पाटील यांना कळताच त्यांनी त्यांच्या कुटुंबाला सांत्वन तर केलेच तसेच कंपनी मध्ये काढलेल्या इन्शुरन्स पॉलिसी बद्दल देखील माहिती दिली. अपघाती मृत्यू झाल्या मुळे त्या पॉलिसीच्या क्लेम साठी लागणारे सर्वोतोपरी कागदी कार्यवाही साठी त्यांनी मदत केले तसेच त्यांचे वरिष्ठ अधिकारी श्री सचिन वडगावकर रिजनल बिजनेस हेड , औरंगाबाद यांच्या देखील त्यांना मार्गदर्शन मिळाले कागदी कार्यवाही पूर्ण करून आज श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स कंपनी ने त्याचे वारस यांना ऑफिसमध्ये प्रत्यक्ष बोलून त्यांना 14 लाख वरून अपघाती मृत्यू असल्या कारणाने त्यांना रुपये 28 लाख मंजूर करून देण्यात आले व त्यांना धनादेश सुपुर्त करण्यात आला. या कार्यक्रमासाठी कंपनीच्या वतीने वरिष्ठ अधीकारी श्री. विक्रम सुर्यवंशी , श्री. सचिन वाडगावकर यांनी लाईफ इन्शुरन्स चे महत्व समजावून सांगितले. घरातील कर्त्या माणसाच्या निधनानंतर त्या कुटुंबातील सदस्य आर्थिक ओढाताण होऊ नये याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले. रावेर शाखाधिकारी श्री. मुकेश पाटील तसेच भुसावळ शाखेचे श्री . रवींद्र पाटील व कर्मचारी योगेश महेश्री,भाविक शहा,घनश्याम पाटील, मिलिंद आत्रे आदि कार्यक्रमात उपस्थीत होते.
या कार्यक्रमातून कंपनी ची त्याच्या ग्राहकांविषयी प्रेम व आत्मीयता लक्षात येते. वाईट प्रसंगातून सुद्धा काही चांगले करण्याचा श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स कंपनीचा, मयत व्यक्तीच्या कुटुंबाच्या भविष्यासाठी चांगला प्रयत्न होता.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत