Contact Banner

पुढील सहा महिने मास्क वापरणे बंधनकारक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

 

पुढील सहा महिने मास्क वापरणे बंधनकारक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई प्रतिनिधी-सध्या राज्यातील करोनाबाधितांची संख्या कमी होत आहे. असं असलं तरी करोनाचा धोका अद्यापही पूर्णपणे टळला नाही. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समाजमाध्यमांद्वारे राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यात नाईट कर्फ्यू लागू करण्याबबात आणि राज्यात पुन्हा लॉकडाउन लागू करायचा अथवा नाही यावर भाष्य केलं.

"युरोपमध्ये, इंग्लंडमध्ये आता पुन्हा एकदा कडक लॉकडाउन लागू करण्यात आलं आहे. गर्दी टाळण्यासाठी त्यांनी लॉकडाउन लागू केलंय. पण करोनानं त्या ठिकाणी आपलं रूप बदलल्याची माहिती माझ्या समोर आली आहे. नवा विषाणू हा करोनापेक्षा अधिक झपाट्यानं पसरतोय. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर त्या ठिकाणी अनेकदा गर्दी होत असते. परंतु त्या ठिकाणी आता पुन्हा लॉकडाउन लागू करण्यात आलं आहे. त्यांच्याकडून आपल्यालाही काही गोष्टी शिकणं आवश्यक आहे. अनेकांनी मला सांगितलं की ज्या चाचण्या करताय त्या आता कमी करा. जे सुरूवातीच्या काळात झालं त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून चाचण्या करतोय. बाहेरून येणाऱ्या लोकांना जर संसर्ग झाला असेल तर त्यांच्यामुळे आपल्याला पुन्हा राज्यात संसर्ग होऊ शकतो.

पुढील सहा महिने मास्क वापरणे बंधनकारक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे pudhil saha mahine mask vaparne bandhankarak mukhyamantri udhav thakre

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.