Contact Banner

रेल्वे लाईन परिसरात आढळलेला तो मृतदेह अनैतिक संबंधातून झाल्याचे निष्पन्न.


रेल्वे लाईन परिसरात आढळलेला तो मृतदेह अनैतिक संबंधातून झाल्याचे निष्पन्न

नशिराबाद प्रतिनिधी - नशिराबाद रेल्वे लाईन परिसरात आढळेला मृतदेह हा अनैतिक संबंधातून खून असल्याचे आज भुसावळचे डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले .    

https://www.lewajagat.com/2020/12/relway%20rulavar%20mrutdeh.ghatpatacha%20sanshay.html

     सविस्तर वृत्त असे की , दीपक रघुनाथ सपकाळे ( वय -२४ ) राहणार रावेर तालुक्यातील सुनोदा यांचा शनिवारी रात्री खून करण्यात आल्यानंतर मृतदेह नशिराबाद हद्दीतील रेल्वे परिसरात टाकण्यात आल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले असून रविवार रोजी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आल्यानंतर मान व अंगावर असलेल्या जखमांच्या आधारे पोलिसांनी ही घटना आकस्मित मृत्यू नसल्याची खात्री झाल्यानंतर खुनाची पुष्टी केली आहे . यामध्ये मयत तरुणाचा एका विवाहित तरुणीशी अनैतिक संबंध असल्यामुळे त्याचा खून झाल्याची माहिती वाघचौरे यांनी दिली . या प्रकरणांमध्ये एक विवाहित महिला व तीन तरुणांचा समावेश आहे . या चौघांनाही अटक करण्यात आली असल्याची माहिती भुसावळचे डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांनी बाजारपेठ पोलिस ठाण्यांमध्ये घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.