सावदा येथे फ्रुटचा ट्रक पलटी क्लिनरचा मृत्यू ; चालक जखमी
सावदा येथे फ्रुटचा ट्रक पलटी क्लिनरचा मृत्यू ; चालक जखमी savdyat trak palti cliner thar tar chalak jakhami
सावदा ( प्रतिनिधी ) अंकलेश्वर - बुऱ्हाणपूर महामार्गावर दि ४ रोजी रात्री ११ वाजेच्या सुमार रावेर कडून सावदा मार्गे येणार ट्रक गॅस गोडाऊन समोर पलटी झाल्याने या घटनेत ट्रक क्लिंनर ठार झाला असून चालक जखमी झालाअसुन मालाचे व ट्रकचे नुकसान झाल्याने पोस्टला गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की ; रावेर कडून सावद्या कडे फ्रुट ने भरलेला ट्रक क्र जे .के.०८ एच९७७६ चा चालक हा भरधाव वेगात येत असताना ग्यास गोडावून समोरच वळणावर्ती जोरदार ब्रेक मारल्याने दि ४ रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास ट्रक अचानक पलटी झाल्याने या घटनेत ट्रक क्लिंनर मुन्ना उर्फ सोमराज रमेशचंद्र हा ठार झाला तर चालक करण राजेश शर्मा हा जखमी झाला आहे .घटनेची माहिती मिळताच सावदा स .पो .नि डी डी.इंगोले सह पोलिसांनी धाव घेतली जखमींना प्रथांमउपचार रुग्णालयात दाखल करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
चालका स्वतः च्या दुखापतीस तसेच मयत क्लिनर मुन्ना उर्फ सोमराज रमेशचंद्र शर्मा याचे मरणास व ट्रकच्या नुकसाणीस कारणीवभुत झाला अस सावडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत