डंपरची दुचाकीस धडक युवकाचा मृत्यू
डंपरची दुचाकीस धडक युवकाचा मृत्यू
फैजपूर प्रतिनिधी -भरधाव डंपरने दोन दुचाकींना धडक दिल्याची घटना दुसखेडा फाटा अकलूज तालुका यावल गावा जवळ
मंगळवारी दुपारी २:३० वाजेच्या सुमारास घडली.या अपघातात भुसावळातील वाल्मीक नगरातील बत्तीस खोली भागातील रहिवासी अजय धिक्याव वय ३८ या युवकाचा मृत्यू झाला. मंगळवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास हा अपघात झाला खडी भरलेला डंपर क्रमांक एमएच १९ एम एच ९८९१ दोन दुचाकींना धडक दिली. या अपघातात विना क्रमांकाच्या दुचाकीवरील अजय ढिक्याव यांच्यासह दुसऱ्या दुचाकीवरील दोन जण जखमी झाले, त्यांची नावे समजू शकली नाहीत. जखमी अजयला डॉक्टर उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात तथा हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.त्यानंतर संतप्त जमावाने डंपरच्या काचा फोडल्या. हा अपघात फैजपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडला घटनास्थळी सहायक फौजदार हेमंत सांगळे,महेश वंजारी, न्यानेश्वर पवार,उमेश सानप यांनी धाव घेऊन पाहणी केली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत