हिंदू मंदिरावरील हल्ल्याच्या प्रकरणात 26 जणांना केली अटक
हिंदू मंदिरावरील हल्ल्याच्या प्रकरणात 26 जणांना केली अटक
वृत्तसंस्था पेशावर:- हिंदू मंदिरावरील हल्ल्याच्या प्रकरणात 26 जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी खैबर पख्यातुनख़्वाच्या करक जिल्ह्यातील टेरी गावात झालेल्या घटनेनंतर ही कारवाई केली.एका कट्टरवादी गटाने मंदिरावर हल्ला केला होता. त्या मंदिराची तोडफोड करण्यात आली होती. त्याचबरोबर मंदिराला पेटवून देण्यात आले होते. पाकिस्तानचे केंद्रीय संसदीय सचिव लालचंद मलाही यांनी अशा घटना स्विकारल्या जाऊ शकत नसल्याचे म्हटले होते.पंतप्रधान इम्रान खान पाकिस्तानात धार्मिक पर्यटनाला प्रोत्साहन देऊ असे आश्वासन देतात. प्रत्यक्षात मात्र अल्प संख्यांक प्रार्थना स्थळे आपल्या देशात सुरक्षित नसल्याची टीका विरोध करतात.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत