Contact Banner

मुक्ताई सहकारी सुतगिरणी येथे निखील खडसे यांना अभिवादन

 


मुक्ताई सहकारी सुतगिरणी येथे निखील खडसे यांना अभिवादन

प्रतिनिधी मुक्ताईनगर:-
स्व.निखिल खडसे यांच्या जयंतीनिमित्ताने स्मृतिस्थळ आदिशक्ती मुक्ताई सहकारी सूतगिरणी मुक्ताईनगर येथे जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे- खेवलकर यांच्या हस्ते स्व. निखिल खडसे यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी बोलताना रोहिनी खडसे यांनी माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी स्थापन केलेल्या मुक्ताई  सूतगिरणीचे काम पूर्णत्वास जाऊन सूतगिरणी सुरू व्हावी व स्थानिक युवकांना, महिलांना रोजगार मिळावा हे निखिल भाऊंचे स्वप्न होते. त्यासाठी ते सूतगिरणीचे चेअरमन झाल्यावर त्यांनी सूतगिरणीचे काम पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न केला. परंतु काळाने त्यांना आपल्यातून हिरावून नेले.त्या नंतर त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी सूतगिरणीचे काम पूर्णत्वास नेले. आज सूतगिरणी सुरू असून सुमारे 250 युवक, महिलांना रोजगार उपलब्ध झाल्याचे रोहिणी खडसे यांनी सांगितले.

यावेळी प्रा.सुनील नेवे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुभाष पाटील, दहरथ कांडेलकर, राजू माळी, ईश्वर रहाणे,  पांडुरंग नाफडे, सूतगिरणीचे उपाध्यक्ष संजय चौधरी, पं.स. सदस्य राजेंद्र सवळे, चंद्रकांत भोलाणे, विनोद पाटील, विनोद सोनवणे, पियुष महाजन, नीलेश शिरसाट, ललीत महाजन, बापू ससाने, आसिफ बागवान, प्रवीण पाटील, सुनील काटे, शिवराज पाटील आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.