Contact Banner

सावदा येथे पत्रकार दिन उत्साहात साजरा

 



सावदा येथे पत्रकार दिन उत्साहात साजरा

सावदा :~(प्रतिनिधी )दि.6 जाने 2020

      आज वर्तमान पत्रे हे  प्रसाराचे माध्यम बनून  समाज आणि शासन यांच्यामधील दर्पण (आरसा) म्हणून कार्य करत आहेत. परंतू आता दर्पण नाही तर प्रतिबिंब म्हणून काम करण्याची गरज निर्माण झाली  आहे. पत्रकारीतेने समाजाचे प्रतिबिंब म्हणून काम केल्यास खर्‍या अर्थाने समाजाला न्याय मिळेल व समाजाचा विकास होईल असे प्रतिपादन दैनिक सकाळचे सावदा प्रतिनिधी प्रविण पाटिल यांनी केले. सावदा शहर पत्रकार   संघातर्फे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीदिनी आयोजित पत्रकार दिनाच्या कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. सर्वप्रथम   दिवंगत लोकमतचे  पत्रकार  सुरेश बेंडाळे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली .नंतर  दर्पणकार  बाळशास्त्री जांभेकर  यांच्या प्रतिमेचे पूजन ज्येष्ठ पत्रकार लाला गोष्टी यांच्या हस्ते करण्यात आले. त्याचप्रमाणे  उपस्थित पत्रकार बांधवांनी ही  पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार  श्याम पाटील आपल्या मनोगतात म्हणाले की ,मराठी पत्रकारीतेचे जनक म्हणून बाळशास्त्री जांभेकर ओळखले जातात. जांभेकरांनी वृत्तपत्राच्या माध्यमातून विज्ञानाचा प्रचार-प्रसार केल्याने त्यांच्या लेखन शैलीतून खर्‍या अर्थाने विज्ञाननिष्ठ महाराष्ट्र घडविण्याचे काम झाले. नवविचाराचे उपासक असणारे जांभेकर हे पत्रकारांचे आदर्श आहेत. आजच्या पत्रकारांनी जांभेकर यांच्या लेखनशैलीचा अभ्यास करून  पत्रकारिता करणे गरजेचे आहे. असेही ते यावेळी म्हणाले.

         कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सावदा शहर पत्रकार संघाचे सचिव रवींद्र हिवरकर हे होते.

 पत्रकार दिन कार्यक्रम प्रसंगी  ज्येष्ठ पत्रकार लाला कोष्टी, श्याम पाटील, राजेंद्र भारंबे तसेच प्रवीण पाटील,अनोमदर्शी तायडे सर , रवींद्र हिवरकर,पंकज पाटिल, कमलाकर पाटिल, रोशन वाघुळदे, साजिद शेख़ ,राजेश पाटिल, राजू दिपके,  भारत हिवरे, अज्जु शेख़  आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.