Contact Banner

मारहाणीत एकाचा मृत्यू , तिघांना अटक

 

मारहाणीत एकाचा मृत्यू , तिघांना अटक  

अमळनेर प्रतिनिधी - जुन्या भांडणाच्या कारणावरून तिघांनी लाठ्या काठ्यांनी मारहाण केल्याने एकाचा मृत्यू झाल्याची घटना ३१डिसेंबर रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास धरणगाव रोड वरील म्हाडा कॉलनीत घडली . गुन्ह्यातील तिघांना पोलीसांनी अटक केली आहे.

सविस्तर  माहिती अशी की , ३१ डिसेंबर  रोजी  सध्याकाळी ५ वाजता शीतल मुकेश सैंदाने व कमल मुनिर फथरोड यांच्यात भांडण सुरू होते . एकमेकांना शिवीगाळ करत होते . त्यावेळी राजेश सिद्धी जाधव यांनी हे भांडण पाहिले , मात्र किरकोळ भांडण असल्याने मिटून जाईल म्हणून त्याने दुर्लक्ष केले . त्यांनतर सायंकाळी साडे सात ते आठ वाजेच्या सुमारास शीतल मुकेश सैंदाने , मुकेश गोकुळ सैंदाने व भाग्यश्री उर्फ भुरी राजेंद्र पाटील या तिघांनी कमल फथरोड याला बोलावून घेतले आणि सायंकाळच्या भांडणाच्या कारणावरून तिघांनी लाठ्या काठ्यानी कमलच्या छातीवर , डोक्यावर , कपाळावर व हातावर मारहाण केली त्यात रक्त सांडून कमल रस्त्यावर पडलेला होता . कमलचा मृत्यू झालेला होता घटनास्थळी शीतलच्या हातातील बांगड्या फुटून पडलेल्या होत्या . म्हाडा कॉलनी टाकरखेडा रस्त्यावर शहराबाहेर ४ किलो मीटर  अंतरावर असल्याने खून होऊन २ तास उलटले तरी याबाबत भीतीने कोणीही वाच्यता करायला तयार नव्हते . रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास पोलिसांना माहिती मिळाल्यावर डीवायएसपी राकेश जाधव , पोलीस निरीक्षक अंबादास मोरे , व पोलिसांनी भेट देऊन पाहणी केली . पोलिसांना माहिती मिळाल्यावर त्यांनी शीतल , मुकेश व भाग्यश्री उर्फ भुरी यांचा शोध घेतला असता ते तिघे फरार झाल्याचे समजले तिघांनी पातोंडा येथे एका ठिकाणी आश्रय घेतल्याचे समजल्यावर पोलिसांनी तेथून तिघांना अटक केली असून तिघांविरुद्ध खुनाचा व अट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.