Header Ads

Header ADS

नागपुरात भीषण हत्याकांड : पत्नी , २ मुले , सासू , मेहुणीची हत्या करून घेतला गळफास


 

नागपुरात भीषण हत्याकांड : पत्नी , २ मुले , सासू , मेहुणीची हत्या करून घेतला गळफास 

 Nagpurat.bhishan.hatyakand.patni.don.mule.sasu.mehunichi.hatya.karun.ghetla.glfas


नागपूर प्रतिनिधी - पत्नी , दोन गोंडस मुले , सासू आणि मेहुणीची हत्या करून नंतर एका मध्यमवयीन गृहस्थाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची भयंकर घटना सोमवारी दुपारी उघडकीस आली . या घटनेमुळे नागपूर शहर हादरले . कौटुंबिक कलहातून हे हत्याकांड घडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे . पाचपावलीनजीक रंभाजी रोडवर बागल व्यायाम शाळेजवळ भाड्याने  हे कुटुंब राहत होते , तर सासू व साली त्याच्या घरापासून १०० मीटर अंतरावर पटवी गल्ली येथे राहत होते . रविवारच्या मध्यरात्री आलोक माटूरकर ( ४२ ) याने आधी सासूच्या घरी जाऊन सासू व मेहुणीची हत्या केली व नंतर घरी येऊन पत्नी व मुलांची हत्या करीत स्वतः फाशी लावून घेतली . 

https://www.lewajagat.com/2021/06/%20%20%20%20%20%20%20.%20%20%20Jalgaonvat.fainance.companiche.managerchi.kamachya%20.tanavatun.atmhatya..html

बराच वेळ होऊनही माटूरकर कुटुंबीयां पैकी कोणीच बाहेर न आल्याने काहींनी त्यांच्या घरात झाकून पाहिले असता घरात सर्वांचे मृतदेह दिसले . मृतांमध्ये पत्नी विजया आलोक माटूरकर( ३५ ) , मुलगी परी माटूरकर ( १४ मुलगा साहील माटूरकर ( ११ ) , सासू लक्ष्मी देविदास बोबडे ( ५५ ) व मेहुणी अमिषा देविदास बोबडे ( २१ ) यांचा समावेश आहे . पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , हत्येपूर्वी आलोकने पत्नीचा गळा आवळून खून केला . मुलीचे हातपाय बांधून मारले , तर मुलाला तोंडावर उशी दाबून मारल्याचे पोलिसांनी सांगितले . सुरक्षा रक्षकाचे काम करणारा सासरा नाइट ड्यूटीवर गेल्यामुळे बचावला . 

हप्ते न भरल्याने बँकेने भूखंड घेतला ताब्यात : 

आलोक माटूरकर टेलरिंगचा व्यवसाय करायचा . त्याने आंतर जातीय विवाह केला होता लग्नानंतर ते अमरावतीत स्थायिक झाले होते . तिथे रेडिमेड कापडाचे दुकानही टाकले होते . ते आगीत भस्मसात झाले . अमरावतीत त्याने लाखांचा भूखंड विकत घेतला होता . मात्र , लॉकडाऊनमुळे व्यवसाय ठप्प झाल्याने हप्ते न भरू शकल्याने बँकेने भूखंड ताब्यात घेतला होता . डोक्यावर कर्ज झाल्यामुळे अमरावतीहून सहा महिन्यांपूर्वीच माटुरकर कुटुंब नागपुरला आले होते . आलोकची मेहुणी अमिषा अमरावतीत त्याच्या घरीच राहात होती . तिच्या शिक्षणाचा खर्च आलोकच करीत होता . मेहुणीची काही मुलांशी असलेली मैत्री आलोकला खटकत होती. दोघांत अनेकदा वाद होत होते .. दोघांमधील वाद एकदा ठाण्यापर्यत गेला होता . एप्रिलमध्ये अमिषाने आलोकची पोलिस ठाण्यात तक्रार केली होती . आलोकने तिची छेड काढून मारहाण केल्याची तक्रार तिने केली होती . नंतर दोघांत समझोता होऊन प्रकरण मिटले . दरम्यान , या बाबत आलोकने काही पत्र लिहून ठेवले का याचा तपास पोलीस करीत आहेत . या शिवाय इतरही कारणांचा शोध घेतला जात आहे .

संदर्भ:-दिव्यामराठी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.