Header Ads

Header ADS

जळगावात आत्महत्या - फायनान्स कंपनीच्या मॅनेजरची कामाच्या तणावातून आत्महत्या. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत मांडली कैफियत


 

जळगावात  फायनान्स कंपनीच्या मॅनेजरची कामाच्या तणावातून आत्महत्या. 

आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत मांडली कैफियत 

Jalgaonvat.fainance.companiche.managerchi.kamachya .tanavatun.atmhatya.

जळगाव प्रतिनिधी -एका फायनान्स कंपनीत क्रेडिट मॅनेजर म्हणून नोकरीला असलेल्या प्रौढाने सोमवारी सकाळी ६.३० वाजता तणावातून राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आत्महत्येपूर्वी प्रौढाने तीन पानांची सुसाइड नोट लिहिली आहे . त्यात त्यांनी कामाचा तणाव असल्याचा उल्लेख केला आहे . दरम्यान , त्यांच्यावर दबाव टाकणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी कुटुंबीयांनी केली आहे .  

https://www.lewajagat.com/2021/06/%20%20%20%20%20%20%20%20%20%20%20%20%20%20%20%20%20%20%20Nagpurat.bhishan.hatyakand.patni.don.mule.sasu.mehunichi.hatya.karun.ghetla.glfas.html

   प्रदीप धनलाल शिंपी ( कापुरे , वय .४५ , रा . मयूर कॉलनी ) असे मृत प्रौढाचे नाव आहे . शिंपी हे मुथूट होमुनी इंडिया लिमिटेड येथे १ नोव्हेंबर २०१७ पासून क्रेडिट मॅनेजर पदावर नोकरीला होते . त्यांच्यावर जळगावसह औरंगाबाद , धुळे व शिरपूर विभागाची जबाबदारी होती . कंपनीच्या विविध प्रकारच्या कामांची जबाबदारी सातत्याने त्यांच्यावर येत होती . यामुळे ६महिन्यांपासून त्यांच्यावर कामाचा ताण वाढला होता . या संदर्भात ते सातत्याने कुटुंबीयांजवळ भावना व्यक्त करीत होते . ८ जून रोजी याच तणावामुळे कार्यालयातच त्यांची प्रकृती खराब झाली होती . तातडीने रुग्णालयात दाखल केले होते . २० जून रोजी ते कुटुंबीयांसह एका कार्याक्रमासाठी नातेवाइकांकडे गेले होते . रात्री उशिरा आल्यानंतर ते एकटेच हॉलमध्ये झोपले . तर पत्नी व दोन्ही मुले मागच्या खोलीत झोपले होते . रात्रीतून त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली . सकाळी ६.३० वाजता ही घटना उघडकीस आली . या वेळी त्यांच्या पत्नी सुचिता यांना जबर धक्का बसला . नातेवाइकांनी मृतदेह उतरवून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातआणला . दरम्यान , कामाच्या तणावातून आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे . पुणे येथील कंपनीचे अधिकारी प्रशांत बर्गे यांनी दिलेल्या अतिरिक्त तणावामुळे पतीने आत्महत्या केली आहे . संदर्भात बर्गे यांच्यावर गुन्हा दाखल करावा तेव्हाच मृतदेह ताब्यात घेऊ असा पवित्रा पत्नी सुचिता यांनी घेतल्याने प्रचंड तणाव निर्माण झाला होता . पोलिस , नातेवाइकांनी समजूत काढल्यानंतर त्यांनी मृतदेह ताब्यात घेण्याची तयारी दाखवली . शिंपी यांच्या पश्चात पत्नी सुचिता , मुलगा कुणाल ( वय १५ ) , मुलगी यज्ञा ( वय ५ ) , आई सुमनबाई आणि बहीण रेखा शिंपी असा परिवार आहे . या प्रकरणी रामानंदनगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे .

संदर्भ-दिव्यामराठी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.