माजी आमदार संतोष चौधरी विरुद्ध गुन्हा-भुसावळच्या सीओंशी वाद अन् शिवीगाळ
माजी आमदार संतोष चौधरी विरुद्ध गुन्हा-भुसावळच्या सीओंशी वाद अन् शिवीगाळ
भुसावळ प्रतिनिधी- शहरातील टिंबर मार्केटमधील अवैध सर्वोदय बांधकामाची पाहाणी करण्यास गेलेल्या पालिकेचे मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांना माजी आमदार संतोष चौधरी यांनी शिवीगाळ करीत वाद घातला . याप्रकरणी सोमवारी रात्री बाजारपेठ पोलिस स्टेशनला संतोष चौधरी विरूद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
सोमवारी सायंकाळी मुख्याधिकारी चिद्रवार यांनी टिंबर मार्केटमधील सर्व्हे नंबरमधील २०६ मधील छात्रालयाच्याजागेवरील सुरु असलेल्या बांधकामाची पाहाणी करण्यासाठी गेले असता , तेथे माजी आमदार संतोष चौधरी आले व त्यांनी मुख्याधिकारी यांच्याशी वाद घातला व शिवीगाळ केली . शासकीय कामात अडथळा आणला म्हणून चिद्रवार यांनी बाजारपेठ पोलिस ठाणे गाठत डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे , पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्याशी चर्चा केली , झालेला प्रकार त्यांना सांगितला . यावेळी माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल चौधरी हे पोलिस ठाण्यात आले होते . त्यांनी झालेला प्रकार प्रयत्न जाणून घेत , प्रकार सामोपचाराने मिटविण्यासाठी मात्र मुख्याधिकारी यांनी दिलेला फिर्यादीवरून संतोष चौधरी यांच्या विरूद्ध गुन्हा दाखल केला आहे . सहायक पोलिस निरीक्षक मंगेश गोटला तपास करीत आहे .
चौधरी यांचा शोध सुरू
बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यावर डीवायएसपी वाघचौरे आणि निरीक्षक भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथक चौधरी यांचा शोध घेत आहे , असे डीवायएसपी वाघचौरे यांनी सांगितले .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत