अल्पवयीन मुलीवर तिघांचा अत्याचार -अल्पवयीनांचा समावेश
अल्पवयीन मुलीवर तिघांचा अत्याचार -अल्पवयीनांचा समावेश
वृत्त संस्था यावल -तालुक्यातील सांगवी खुर्द येथील १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बुधवारी दुपारी शेतात, तिघांनी सामूहिक अत्याचार केला. या प्रकरणी यावल पोलिसात पोस्कोसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे. तिघा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यापैकी दोन संशयित अल्पवयीन आहेत. घटनेची माहिती मिळताच फैजपूरचे डीवायएसपी डॉ. कुणाल सोनवणे यांनी पीडीत कुटुंबियांची भेट घेतली.
सांगवी खुर्द पीडीतेने दिलेल्या फिर्यादीननुसार बुधवारी (दि. २६) दुपारी अडीच वाजेच्या सुमारास ती गावालगत शौचासाठी जात होती. तिला एकटी पाहुन तिघा संशयीतांनी अल्पवयीन मुलीचे तोंड दाबून शेजारच्या शेतात ओढून नेले. त्या ठिकाणी तिघांनी आळीपाळीने तिच्यावर अत्याचार केला. या घटनेची माहिती कुणाला दिल्यास ठार मारण्याची धमकी दोघांनी मुलीला दिली. पीडीतेने घडलेली घटना सांगितली. त्यानंतर रात्री मुलीसह नातेवाईकांनी यावल पोलिस ठाणे गाठले. बुधवारी रात्री दोन अल्पवयीनांना पोलिसांनी ताब्यात घेतले. दोन अल्पवयीनांना जळगाव येथे विशेष बाल न्यायालयात हजर करून, बाल सुधारगृहात रवाना करण्यात आले आहे. यावल पोलिस गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत.
गुरूवारी या घटनेची सखोल चौकशी केली असता यात संशयीत सतीश प्रभाकर धनगर (रा. सांगवी खुर्द) या मुख्य संशयिताचे नाव समोर आले. ताब्यात घेतल्यावर त्याने गुन्ह्याची पोलिसांकडे कबुली दिली आहे. फैजपूरचे डीवायएसपी डॉ. कुणाल सोनवणे यांनी यावलला पीडीत कुटुंबाची भेट घेतली. तसेच त्यांना धीर दिला. फॉरेन्सिक पथकाने तपासणी करत तिघा संशयितांची वैद्यकीय तपासणी केली. या घटनेमुळे गावात खळबळ उडाली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत