Contact Banner

ऐनपूर येथे आ.चंद्रकांतभाऊ पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार उद्घाटन संपन्न.

 


ऐनपूर येथे आ.चंद्रकांतभाऊ पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार उद्घाटन संपन्न.

लेवाजगत न्यूज ऐनपूर-येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आमदार चंद्रकांतभाऊ पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार उद्घाटन सोहळा संपन्न. यावेळी आमदार चंद्रकांतभाऊ पाटील यांच्या विकासरुपी नेतृत्वावर विश्वास ठेवत युवासेना उपतालुका प्रमुख तुषार कचरे यांना साथ देत ऐनपूर येथील असंख्य युवकांचा शिवसेना पक्षात प्रवेश.


सदरील कार्यक्रमास आमदार चंद्रकांतभाऊ पाटील यांचे आगमन झाले असता बस स्टँड पासून ते कार्यक्रम स्थळापर्यंत ढोल ताशांच्या गजरात भव्य रॅली काढून छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वाराचे उद्घाटन करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीस हार अर्पण करून मोहन कचरे, श्रावण महाजन, सुधीर महाजन, प्रदीप कचरे, महेंद्र कचरे, प्रवीण कचरे, कांतीलाल महाजन, रामा महाजन, दीपक महाजन, अरुण बारी, अश्विन महाजन, विलास कोळी, विकास महाजन, उमेश महाजन, सौरव धनके यांच्या सह असंख्य युवकांनी आमदार चंद्रकांतभाऊ पाटील यांच्या हस्ते शिवसेना पक्षात प्रवेश केला.

यावेळी आमदार चंद्रकांतभाऊ पाटील यांनी मनोगत व्यक्त केले असता, सगळ्याच स्थरातील लोक शिवजयंतीचा कार्यक्रम अतिशय चांगला करत असतात. प्रथमतः मला इथे बोलावून माझ्या हातून उद्घाटन करून घेतले माझा सत्कार केला त्याबद्दल आपले सर्वांचे आभार मानतो. ज्या एकजुटीने आपण सर्वांनी शिवसेनेत प्रवेश करून घेतला त्या तरुणांना जे अपेक्षित आहे त्याच पद्धतीचे काम आपल्या गावात - आपल्या परिसरात आणि पंचकोशीतील करण्याचा माझा मानस असेल, मी नम्रतेने आपल्याला विनंती करतो आपल्या काही अडचणी असतील तर त्या माझे पदाधिकारी व माझ्यापर्यंत पोहचवा निश्चित त्या पूर्ण करण्याचा माझा प्रयत्न असेल असे प्रतिपादन केले.

    या कार्यक्रमास उपस्थित शिवसेना मा. ता. प्रमुख रविंद्र महाजन, शिवसेना उप. ता. प्र. छोटू पाटील, युवासेना उपतालुका प्रमुख तुषार कचरे, तुषार बोरसे, सुरज परदेशी, ग्रा. पं. सरपंच, सदस्य व मोठ्या संख्येने ग्रामस्थ तसेच शिवप्रेमी उपस्थित होते.

सूत्रसंचालन मोहन कचरे यांनी केले तर आभार युवासेना उपतालुका प्रमुख तुषार कचरे यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.