पती मंदिरात तर घरात शॉक लागून पत्नी ठार
पती मंदिरात तर घरात शॉक लागून पत्नी ठार
लेवाजगत न्यूज जळगाव- आंघोळ करुन पती मंदिरात दर्शनासाठी गेल्यानंतर घरात पाणी तापवण्याच्या हिटरचा शॉक लागल्याने पत्नीचा मृत्यू झाला. रविवारी सकाळी नऊ वाजता योगेश्वर नगरात ही दुर्दैवी घटना घडली. सुषमा प्रकाश महाजन (वय ५०, रा. योगेश्वरनगर) असे मृत महिलेचे नाव आहे.
घटना अशी की, शहरात एका हॉटेलमध्ये काम करणारे प्रकाश महाजन यांचे कुटुंब योगेश्वर नगरात राहते. रविवारी सकाळी प्रकाश महाजन हे मंदिरात दर्शनासाठी गेले. यांनतर त्यांच्या पत्नी सुषमा यांनी बादलीत हिटर टाकून पाणी तापवण्यासाठी ठेवले होते. पाणी गरम झाले की नाही हे पाहण्यासाठी त्यांनी बादलीला हात लावताच जोरदार विजेचा धक्का बसला. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटना कळताच कुटुंबीयांनी त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. तत्पूर्वी त्यांचा मृत्यू झालेला होता. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करुन त्यांना मृत घोषित केले. या घटनेने महाजन कुटुंबीयांना धक्का बसला. कुटुंबीय, नातेवाईकांनी रुग्णालयात आक्रोश केला. मृत सुषमा महाजन यांच्या पश्चात पती, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. या प्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत