Contact Banner

कृषिसेवक’ तर्फे सन्मान मातीचा..सन्मान भूमीपुत्रांचा ...कृषी पुरस्काराचे रावेरात वितरण

 


कृषिसेवक’ तर्फे सन्मान मातीचा..सन्मान

भूमीपुत्रांचा ...कृषी* *पुरस्काराचे रावेरात वितरण


लेवाजगत न्यूज रावेर- "शेती हा समाज जीवनाचा आत्मा आहे,शेतीवर संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था अवलंबून आहे,खान्देशातील कृषी क्षेत्रात मोठी क्रांती घडून येत असल्याचे" गौरवोद्गार खासदार रक्षा खडसे यांनी काढले. ‘कृषिसेवक’ साप्ताहिकच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित ‘कृषिसेवक’ पुरस्कार वितरण सन्मान सोहळा रावेर येथील श्रीराम मायक्रो व्हिजन अँकेडमी स्कुलच्या सभागृहात  संपन्न झाला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार अरुणदादा पाटील होते.तर उदघाटन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रजनी पाटील यांनी केले.

प्रमुख अतिथी म्हणून रावेर लोकसभा मतदार संघाच्या खासदार रक्षा खडसे यांच्यासह जैन उद्योग समूहाचे उपाध्यक्ष आणि कृषी शास्त्रज्ञ डॉ.के.बी.पाटील, भाजपा किसान मोर्चाचे सुरेश धनके, उद्योजक प्रशांत सरोदे ,तहसिलदार श्रीमती उषाराणी देवगुणे, भाजयुमो जिल्हाध्यक्ष श्रीकांत महाजन, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, जिल्हा परिषद सदस्य नंदकिशोर महाजन ,राष्ट्रवादी किसान सभेचे सोपान पाटील,फार्मर ऍग्रो प्रोड्युसर कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सी.एस.पाटील,केळी कामगार नेते दिलीप कांबळे, अनंत बागुल, आयोजक 'कृषिसेवक'चे संपादक कृष्णा पाटील,माजी सभापती जितेंद्र पाटील ,राष्ट्रीय कृषी पत्रकार संघ नागपूरचे गजानन गिरोडकर ,महेश पाटील ,दीपक कापोते , आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.तर उपस्थितांमध्ये गोदावरी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य तथा हवामान शास्त्रज्ञ डॉ.एस.एम.पाटील , कलावंत व जेष्ठ पत्रकार तुषार वाघुळदे ,जुन्नरचे उत्तम जाधव,गिरीश जगदेव यांचीही उपस्थिती होती.माजी आमदार अरुण पाटील यांनी सांगितले की, शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी कृषिसेवकने सकारात्मक पाऊल उचलले आहे, शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव मिळाला पाहिजे यासाठी शासनदरबारी मोठ्या स्वरूपात प्रयत्न होणं आवश्यक आहे .या प्रसंगी कृषी विशेषांकाचे प्रकाशन मान्यवरांनी केले.

या कार्यक्रमात पत्रकार तसेच सामाजिक कार्यकर्ते तुषार वाघुळदे ,शालीक पाटील,देवलाल पाटील आणि निवेदिका ,गायिका ज्योती राणे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

 राज्यातल्या भूमिपुत्रांना पाहुण्यांच्या हस्ते कृषिसेवक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने दुल्लभ जाधव,अतुल मधुकर पाटील,केदार कुलकर्णी, प्राचार्य डॉ.एस.एम.पाटील ,सुनील तराळ,विनोद तोडकर,डॉ.अश्विनी चरपे,डॉ.सोपान वाघ ,डॉ.अंबादास मेहेत्रे ,प्रा.तुषार उगले,प्रा.संदीप जायभाये,शशांक पाटील,अशोक कुटे,शुभम माळोदे,रवींद्र भोगे,अमोल पाटील,अजय राणे,उत्तम जाधव,ज्ञानेश्वर पाटील ,पंकज घाटे , रोहन लोखंडे,मिलिंद घोरपडे, कोमल चव्हाण,जितेंद्र दुर्गे यांच्यासह अनेकांचा गौरव करण्यात आला..

   कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृष्णा पाटील तर सूत्रसंचालन ज्योती राणे पाटील यांनी केले. या सोहळ्यास शेतकरी, कृषी अभ्यासक यांची उपस्थिती होती..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.