Contact Banner

अजिंठा चौफुलीवर अपघात • घटनास्थळावरून मृताचा मोबाइल लंपास ट्रॅव्हल्सचे ब्रेक निकामी , दुचाकीला ओढत नेले ; आरोग्य कर्मचारी ठार


 
अजिंठा चौफुलीवर अपघात • घटनास्थळावरून मृताचा मोबाइल लंपास ट्रॅव्हल्सचे ब्रेक निकामी , दुचाकीला ओढत नेले ; आरोग्य कर्मचारी ठार

लेवाजगत प्रतिनिधी जळगाव- अचानक ब्रेक फेल झालेल्या एका ट्रॅव्हल्सने आरोग्य कर्मचाऱ्याच्या दुचाकीला धडक देऊन सुमारे २५ फुटांपर्यंत फरफटत नेले मृत विनय खड़के या अपघातात डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने दुचाकीस्वाराचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. घटनास्थळावरून कुणीतरी मृताचा मोबाइल लंपास केला. 

       हा अपघात मंगळवारी  ३.३० वाजेच्या सुमारास अजिंठा चौफुलीवर झाला. विनय रामचंद्र खडके ( वय ५३ , रा. सोपानदेवनगर ) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. खडके हे सिव्हिलचे कर्मचारी होते. सध्या त्यांची नियुक्ती पारोळा येथे करण्यात आली होती. ड्यूटीवरून घरी येत असताना त्यांचा हा अपघात झाला मंगळवारी ड्यूटी आटोपल्यानंतर खडके हे दुचाकौने ( क्रमांक एमएच १९ यू ७३०३ ) घराकडे निघाले होते . याचवेळी अजिंठा चौफुलीवर एमएच -१९ , वाय -३३५५ क्रमांकाच्या ट्रॅव्हल्सचे ब्रेक फेल झाल्याने चालकाने थेट खडके यांना धडक दिली.  त्यानंतर त्यांना सुमारे २५ फुटांपर्यंत फरफटत नेले. या अपघातात खडकेंच्या डावा पाय , डोक्यावर गंभीर दुखापत झाली. डोक्याला मार लागल्यामुळे त्यांना काहीच समजत नव्हते. अशात सचिन भारुळे ( रा. सिद्धार्थनगर ) या अल्पवयीन मुलाने मोठ्या साहसाने एका रिक्षातून त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणले . सुमारे दीड तास उपचार केल्यानंतर खडकेंचा मृत्यू झाला. कुटुंबीयांना ही बातमी मिळताच त्यांनी रुग्णालयात धाव घेत आक्रोश केला. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते . मृत खडके यांच्या पश्चात पत्नी रोहिणी व मुलगा आतिष असा परिवार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.