आमच्या शेतमालाला भाव देता येत नसेल, तर किमान संरक्षण तरी करा वारंवार शेतमाल, साहित्य चोरीने त्रस्त शेतकरी रोझोदा येथे एकवटले
आमच्या शेतमालाला भाव देता येत नसेल, तर किमान संरक्षण तरी करा
वारंवार शेतमाल, साहित्य चोरीने त्रस्त शेतकरी रोझोदा येथे एकवटले
लेवाजगत न्यूज सावदा- राज्यकत्यांकडून शेतमालाला रास्त भाव दिला जात नसेल तर किमान त्याचे रक्षण तरी करा. शेतकऱ्यांना होणारी मारहाण, शेतीमालाची चोरी, नासधूस या घटना थांबवा. अन्यथा तीव्र आंदोलन उभारू, रोझोदा येथील बैठकीत मार्गदर्शन करताना शेतकरी. अशी संतप्त प्रतिक्रिया सावदा पंचक्रोशीतील शेतकऱ्यांमधून उमटली. गेल्या काही दिवसांपासून भुरट्यांकडून शेती मालाची चोरी नुकसान, शेतकऱ्यांना धमकावणे, मारहाणीचे प्रकार होत आहेत. या पार्श्वभूमीवर सोमवारी सायंकाळी रोझोदा येथील काम सिद्ध महाराज मंदिरात शेतकऱ्यांची बैठक झाली.
रोझोदा येथील विजय महाजन, रमेश महाजन, चिमण धांडे, मिलिंद वायकोळे, रवींद्र चौधरी, विजय महाजन, रोझोदा उपसरपंच दीपक धांडे, चिनावलचे गोपाळ नेमाडे, श्रीकांत महाजन, दामोदर महाजन, योगेश बोरोले, सावखेडा येथील प्रमोद महाजन, हेमंत महाजन भागवत महाजन, नामदेव महाजन हिरामण महाजन, खिरोदा येथील किशोर चौधरी, हर्षल बोरोले,चिनावल पोलिस पाटील नीलेश नेमाडे, रोझोदा पोलिस पाटील वासुदेव हिवरे कोचूर येथील कमलाकर पाटील व शेतकरी उपस्थित होते. मिलिंद वायकोळे यांनी शेतकरी संघटीत होऊन आंदोलन केल्याशिवाय हे प्रकार थांबणार नाही. तर परिसरातील
अधिकारी मग्रूर झाले आहेत. या परिसराची ही शोकांतिका आहे असे विजय महाजन म्हणाले, शेतीमाल चोरी करणाऱ्यांना हटकल्याने चिनावल येथील शेतकरी महाजन यांना झालेल्या मारहाणीमुळे राज्यात मोगलाई आहे का? असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला.
सावदा पोलिसांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नापसंती
परिसरात गेल्या तीन-चार महिन्यांपासून शेतमाल व शेतीसाहित्या चोरी, वीज तारांची चोरी अशा घटना वाढल्या आहेत. यंत्रणा व व्यवस्थेकडे वेळोवेळी तक्रारी करूनही न्याय मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. गेल्या महिन्यात रणगाव, रायपूर, तासखेडा, उधळी भागात वीज पंप, चिनावल, कोचूर बुद्रुक, कोचूर खुर्द, सावखेडा, रोझोदा, खिरोदा, कुंभारखेडा, सावखेडा शिवारातील पशुधन चोरी, स्टार्टर फोडणे, केबल जाळणे, ठिबक सिंचन व पीव्हीसी पाइप चोरीच्या घटना घडूनही पोलिस यंत्रणा सुस्त असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत