Contact Banner

लेवा पाटीदार प्रीमियर लीग या क्रिकेट स्पर्धेची मान्यवरांच्या हस्ते सुरुवात

 


लेवा पाटीदार प्रीमियर लीग या क्रिकेट स्पर्धेची मान्यवरांच्या हस्ते सुरुवात

लेवाजगत न्यूज जळगाव:‘लेवा पाटीदार सोशल अ‍ॅण्ड स्पोर्टस् फाऊंडेशन’ आयोजित सरदार वल्लभभाई पटेल चषक-२०२२ अर्थात लेवा पाटीदार प्रीमियर लीग या क्रिकेट स्पर्धेचे शिवजयंतीनिमित्त शनिवार, दि.१९ फेब्रुवारी २०२२पासून सागर पार्कवर आयोजन करण्यात आले आहे. रविवार, दिनांक २२ फेब्रुवारी  रोजी छत्रपती शिवाजी महाराज, देशाचे माजी गृहमंत्री तथा लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल आणि खानदेशकन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमांना माल्यार्पणासह अभिवादन करून या स्पर्धेचे महापौर व जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका जयश्री सुनिल महाजन यांच्या हस्ते स्पर्धेसाठीच्या धावपट्टीचे पूजन, नाणेफेकीसह क्रिकेट खेळून उद्घाटन करण्यात आले. 

      त्यानंतर पहिल्या सामन्याला सुरूवात झाली. या स्पर्धेचे जय दुर्गा ग्रुप, मेहरुण, जळगाव तसेच महापौर जयश्री सुनिल महाजन मुख्य प्रायोजक असून, भंगाळे गोल्ड प्रायोजक असून, एल.के. फाऊंडेशनचे अनमोल सहकार्य तसेच सहप्रायोजक व इतरही सामाजिक संस्थांचे अनमोल सहकार्य लाभत आहे. स्पर्धा २० ते २७फेब्रुवारी २०२२ पर्यंत खेळली जाणार असून, यासाठी पुरुषांचे ३०, तर महिलांचे २ संघ सहभागी झालेले आहेत. स्पर्धेनंतर विजेत्यांना पारितोषिके दिली जाणार आहेत.

       याप्रसंगी आमदार सुरेश ऊर्फ राजूमामा भोळे, माजी महापौर तथा नगरसेवक ललित कोल्हे, भंगाळे गोल्ड या सुवर्णपेढीचे संचालक सागर भंगाळे,चंदन कोल्हे, अमोल धांडे यांच्यासह जय दुर्गा ग्रुप, मेहरुण, जळगावचे सर्व पदाधिकारी, शिवप्रेमी व क्रिकेट संघांतील खेळाडू यांच्या उपस्थितीत स्पर्धेतील प्रथम, द्वितीय, तृतीय विजेत्यांना देण्यात येणारे करंडक तसेच उत्तेजनार्थ ठरणार्‍या संघांना देण्यात येणार्‍या करंडकाचेही अनावरण करण्यात आले. स्वप्नील नेमाडे यांनी सूत्रसंचालन केले. अभिजित महाजन यांनी आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.