पोलिसांत तक्रार केल्याचा राग- चिनावलयेथील शेतकऱ्यांचे केळी घड कापून नुकसान शेतकरी संतप्त
पोलिसांत तक्रार केल्याचा राग-
चिनावलयेथील शेतकऱ्यांचे केळी घड कापून नुकसान शेतकरी संतप्त
लेवाजगत न्यूज सावदा - काल चिनावल येथे शेतकरी तरुणांना चोरट्यांनी मारहाण केली होती या स्थानिक चोरट्यांन च्या कुटुंबियांनी आज पुन्हा ज्या शेतकऱ्यांना मारहाण केली होती त्याच्याच केळी बागातील सुमारे ४० ते ५० केळी घड कापून नुकसान केल्याने या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान तर झालेच मात्र चिनावल व परिसरातील शेतकऱ्यांन मध्ये घबराट पसरली आहे
काल एवढी मोठी घटना घडून ही या चोरट्यांनी पुन्हा शेतकऱ्यांनवर राग धरून केळी बागांचे नुकसान केले या मुळे कायदा सुव्यवस्था आहे की नाही असा सवाल शेतकरी लोकप्रतिनिधी व प्रशासनाला विचारु लागले आहे असेच घडत राहिले तर शेतकऱ्यांनी कुणाकडे दाद मागावी अशी संतप्त भावना उमटत आहे
आज पुन्हा तुषार अशोक महाजन यांनी पिक सस्थेच्या माध्यमातून सावदा पोलिसांत तक्रार दिली आहे दरम्यान सकाळी केळी घड कापून नुकसान केल्याचे समजताच गावात प्रचंड खळबळ उडाली घटनास्थळी सावदा पोलिस स्टेशन चे सपोनि देविदास इंगोले ,पो उप निरीक्षक पवार , गायकवाड यांनी भेट दिली या वेळी शेतकऱ्यांनी दोषींवर तात्काळ कारवाई ची मागणी केली व नुकसानी ची पाहणी केली.चिनावल गावात पोलीस उपनिरीक्षक समाधान गायकवाड यांचे सह पोलीस कर्मचारी ठाण मांडून बंदोबस्त करीत आहे .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत