भाचीसह गर्भवती मामीचा तलावामध्ये बुडून मृत्यू
भाचीसह गर्भवती मामीचा तलावामध्ये बुडून मृत्यू
वृत्त संस्था सोनगीर-धुळे तालुक्यातील नंदाणे गावालगत असलेल्या पाझर तलावात कपडे धुण्यासाठी गेलेल्या गर्भवती महिलेसह तिच्या भाचीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली. या प्रकरणी सोनगीर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सुंदराबाई समाधान होलार (वय २१) या भाची शिवानी आंबा होलार (वय ७) यांच्यासह कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. या वेळी सुंदरबाई धुण्यात व्यग्र होत्या. त्या वेळी गावालगत पाझर तलाव आहे. या त्यांच्या जवळ उभ्या शिवानीचा पाय घसरला आणि ती तलावात पडली. तिला वाचवण्यासाठी मामी सुंदरबाई यांनी प्रयत्न केला. या वेळी सुंदरबाई यांचा तोल गेल्याने त्याही पाण्यात पडल्या. हा प्रकार जवळच्या शेतात गुरे चारत असलेल्या आबा भील याच्या लक्षात आला. त्यानंतर त्याच्यासह ग्रामस्थांनी तात्काळ मामी व भाचीला पाण्यातून बाहेर काढले. त्यानंतर दोघांना सोनगीर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. या वेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सुंदरबाई समाधान होलार (वय २१ रा. नंदाणे) व त्यांची भाची शिवानी आबा सोलार (वय ७, रा. नागद, ता. चाळीसगाव) या दोघांना मृत घोषित केले. सुंदरबाईचे तीन वर्षांपूर्वी नंदाणे येथील समाधान होलार यांच्याशी लग्न झाले होते. समाधान होलार हे वाजंत्री वाजवतात. सुंदरबाई गर्भवती होती. या प्रकरणी सोनगीर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली. घटनास्थळी नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत