Contact Banner

उसनवारीच्या पैशांवरून शुभम माळीचा खून, मामेभावाने दिली गुन्ह्याची कबुली



 उसनवारीच्या पैशांवरून शुभम माळीचा खून, मामेभावाने दिली गुन्ह्याची कबुली

लेवाजगत न्यूज जळगाव -उसनवारीच्या ४५ हजार रुपयांवरून शुभम नंदू माळी याला कांग नदीच्या पुलावरून फेकून दिले. नंतर अपघात दाखवण्यासाठी त्याची दुचाकी खाली फेकली. तेरा दिवसांनंतर या खुनाचा उलगडा झाला. मामेभाऊ पवन अशोक माळी (रा. बोदवड) याने रविवारी कबुली दिली.

     ३१ जानेवारी रोजी सकाळी शुभमचा मृतदेह जामनेर - बोदवड रस्त्यावरील कांग नदीपात्रात आढळून आला. जवळच दुचाकीही पुलाखाली पडली होती. गुजरात येथून ट्रक चालवून येत असलेल्या शुभमने धुळ्यातून कुटुंबीयांना फोन केला होता. मध्यरात्री घरी येईन, असा निरोप त्याने दिला होता; परंतु, दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचा मृतदेह मिळाला. सुरुवातीला हा अपघात असल्याचे दिसून येत होते. त्या अनुशंगाने अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. पण हा खूनच असल्याच्या अनेक बाबी पोलिस तपासात समोर आल्या. त्या अनुशंगाने स्थानिक गुन्हे शाखेने तपास सुरू केला. पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी घटनास्थळी भेट देऊन चौकशी केली होती. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाल, उपनिरीक्षक अमोल देवढे व पथकाने तांत्रिक माहितीच्या आधारे रविवारी पवनला ताब्यात घेऊन खाक्या दाखवला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.