Header Ads

Header ADS

धक्कादायक.. भोंदूबाबाचा आईसह 3 मुलींवर बलात्कार; धर्मांतराचाही प्रयत्न


 धक्कादायक.. भोंदूबाबाचा आईसह 3 मुलींवर बलात्कार; धर्मांतराचाही प्रयत्न

लेवाजगत न्यूज नाशिक (Nashik) -जिल्ह्यातील येवला येथून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामुळे नाशिक पुन्हा एकदा बलात्काराच्या घटनेने हादरला आहे. एका भोंदूबाबाने व त्याच्या भावाने आईसह 3 मुलींवर बलात्कार (Rape) केल्याची तक्रार शहर पोलीस (Police) ठाण्यात दाखल झाली आहे. शिवाय या प्रकरणात धमकी देऊन पैसे उकळण्यात आले. त्यामुळे पीडितेने शेवटी पोलिसांकडे धाव घेतली. या बलात्काराच्या घटनेने नाशिक जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

प्रकरण आहे तर काय.?


मुलीचे लग्न जमत नसल्याने येवला तालुक्यातील नागडे गावातील एक महिला एका भोंदूबाबाकडे गेली होती. तेव्हा या बाबाने मुलीला जादूटोणा झाला आहे, असे सांगितले. आईसह 3 मुलींना पिण्यासाठी पाणी दिले. त्यानंतर चाकूचा दाखवून वकील भावासह बलात्कार केला, असे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी भोंदूबाबा आणि त्याच्या वकील भावावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


अडीच वर्षे अत्याचार


भोंदूबाबा आणि त्याच्या भावाने अत्याचाराचे व्हिडिओ शुटींग केले होते. हे शुटींग दाखवून ते ब्लकमेल करायचे. त्यांनी आतापर्यंत या कुटुंबाकडून ८ लाख रुपये उकळले होते. तसेच आईसह तीन मुलींवर दोन वर्षे चार महिने वेळोवेळी अत्याचार केल्याचेही पीडितेने पोलिसांना सांगितले आहे. या जाचाला कंटाळून शेवटी त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली.


धर्मांतराचाही प्रयत्न


भोंदूबाबाने अत्याचार केला. पैसे वसूल केले. त्यानंतर या पीडितांच्या मनात हिंदू धर्माबद्दल द्वेष निर्माण केला. त्यांना मुस्लीम धर्म स्वीकारण्यास प्रवृत्त केल्याची फिर्यादही पीडितेने पोलिसांकडे नोंदवली आहे. याप्रकरणाची गंभीर दखल घेत शहर पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.