बोदवडमध्ये तरुणाची शेतात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या
बोदवडमध्ये तरुणाची शेतात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या
लेवाजगत न्यूज प्रतिनिधी- बोदवड येथील शिवाजीनगरातील रहिवासी २२ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली . या घटनेमुळे गावात खळबळ उडाली .
गणेश विनोद काळे असे मृताचे नाव आहे . ६ फेब्रुवारी रोजी रात्री साडेदहा वाजल्यानंतर मलकापूर रोडवरील संजय काळे , अशोक बारी यांच्या शेताच्या बांधावरील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन गणेश काळे याने आत्महत्या केली . आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही . तरुण मुलाने आत्महत्या केल्याने कुटुंबीय हादरले . याप्रकरणी संजय काळे यांच्या खबरी वरून बोदवड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत