राष्ट्रवादीच्या शेख यांनी शिवसेनेला शिकवू नये राष्ट्रवादीच्या आरोपांना शिवसेनेकडून प्रत्युत्तर
राष्ट्रवादीच्या शेख यांनी शिवसेनेला शिकवू नये
राष्ट्रवादीच्या आरोपांना शिवसेनेकडून प्रत्युत्तर
लेवाजगत न्यूज मुक्ताईनगर-शरद संवाद यात्रेत' राष्ट्रवादीने मुक्ताईनगर मतदार संघात बोदवड, कुऱ्हा व सावदा येथे मेळावे घेतले. त्यात केवळ मुक्ताईनगरातील शिवसैनिक व विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका व दिशाभूल करणारे वक्तव्य झाली. राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी सेनेला महिलांचा सन्मान करावा, असा सल्ला दिला. मात्र, ज्यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल आहे, त्यांनी महिला सन्मानाविषयी आम्हाला शिकवू नये असा प्रतिहल्ला शिवसेनेने सोमवारी पत्रकार परिषदेत केला.
शिवसेना अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हा संघटक अफसर खान, शहर प्रमुख गणेश टोंगे,युवासेना उपजिल्हाप्रमुख पवन सोनवणे, संतोष माळी, दीपक बोदडे, अनास खान, जिवराम कोळी यांनी पत्रकार परिषद घेतली. अफसर खान म्हणाले की, आम्ही आजही महाराष्ट्रातील महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीच्या नेतृत्वाचा व पदाधिकाऱ्यांचा आदर करतो. मात्र, बाहेरून येणाऱ्यांनी विनाकारण शिवसेनेची छबी खराब करू नये. त्याऐवजी मुक्ताईनगर तालुक्यातील युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष शाहीद खान यांनी राजीनामा का दिला ? याचा शोध घ्यावा. त्याच प्रमाणे भारतरत्न लता मंगेशकर यांचे निधन झाल्याने संपूर्ण देशभर दुखवटा असताना युवा संवाद यात्रेचा कार्यक्रम कसा होतो? अशी विचारणा केली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत