Header Ads

Header ADS

सूर्यसप्तमी महोत्सव आणि सामुहिक जनेऊ धारण संस्कार कार्यक्रम संपन्न

 सूर्यसप्तमी महोत्सव आणि सामुहिक जनेऊ धारण संस्कार कार्यक्रम संपन्न      

 जळगाव प्रतिनिधी :-शाकद्वीपीय ब्राह्मण समाजाचे आराध्य दैवत भगवान सूर्यनारायण यांची माघ महिन्याची सप्तमी म्हणजे रथसप्तमी सालाबाद प्रमाणे यंदा या वर्षी ही सूर्यसप्तमी महोत्सव कार्यक्रम शाकद्वीपीय ब्राह्मण समाजाच्या मुलांचां जनेऊ धारण संस्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सकाळी सर्वप्रथम सूर्योदया पासून सूर्यदेवाची पूजा, अर्चना, होमहवन सुरू करण्यात आले. भगवान सूर्यनारायण पूजा होम हवन चे श्री.भूषण शर्मा सपत्नीक व श्री.अक्षय शर्मा सपत्नीक यजमान होते,तर सामुहिक जनेऊ धारण कार्यक्रमाचे मुख्य यजमान श्री.अमित शर्मा सपत्नीक होते. पण्डित गोपालजी तिवारी यांनी मुख्य पोराहित्य केले.  शासकीय नियमानुसार सर्व नियमाचे पालन करून सदर कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाले. कार्यक्रमासाठी सर्व जिल्हास्तरीय समाज बंधु सहपरिवार मोठ्या संख्याने उपस्थित होते व सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

      महाराष्ट्र शाकद्वीपीय ब्राह्मण सभेचे महामंत्री शिवप्रसाद शर्मा ,सदस्य सुरेश एम शर्मा,सौ. गायत्रीजी शर्मा ,तसेच जयंत शर्मा नाशिक, राजस्थानी ब्राह्मण संघाचे अध्यक्ष सत्यनारायण खटोड, बहुभाषिक ब्राह्मण संघाचे अध्यक्ष अशोक वाघ यांची विशेष उपस्थिति होती. 

   कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाकद्वीपीय ब्राह्मण नवयुवक मंडळाचे अध्यक्ष सचिन शर्मा, उपाध्यक्ष अमित शर्मा, आशिष शर्मा,सेक्रेटरी विशाल शर्मा,प्रकाश शर्मा,किशोर शर्मा,किशन अबोटी, सन्दीप शर्मा,चेतन शर्मा, धनराज शर्मा, रविंद्र शर्मा, किर्ती शर्मा,मनीष शर्मा भुसावल ,उमेश शर्मा, आदिनी कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी विशेष परिश्रम केले.

सर्व कार्यक्रम कोविंड नियमावली नुसार संपन्न झाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.