Header Ads

Header ADS

बोदवड येथील श्री स्वामी समर्थ केंद्र बांधकामाची सुरुवात

 बोदवड येथील श्री स्वामी समर्थ केंद्र बांधकामाची सुरुवात


तुषार बोरसे यांच्या शुभ हस्ते करण्यात आला शिलान्यास


बोदवड प्रतिनिधी :  येथील कोटेचा नगर मधील दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ केंद्राच्या बांधकामाचा शिलान्यास षोडपचार पूजा करून करण्यात आला. शिलान्यास कार्यक्रम दत्तप्रभु कन्स्ट्रक्शनचे संचालक तुषार बोरसे यांच्या शुभ हस्ते पार पडला.

     प्रसंगी नवनियुक्त नगरसेवक विजय बडगुजर, भरतअप्पा पाटील , प्रितेश ( गोलू ) बरडिया, माजी नगरसेवक संजू गायकवाड , मुक्ताईनगर चे नगरसेवक संतोष मराठे,माजी उपजिल्हाप्रमुख गोपाळ सोनवणे,संदीप पारधी सर , संजय वराडे, सुधीर कुलकर्णी तसेच बोदवड परिसरातील श्री स्वामी समर्थ सेवेकरी उपस्थित होते. 

 

   गेल्या काही दिवसांपूर्वी आमदार चंद्रकांत पाटील यांच्या सौभाग्यवती सौ यामिनीताई पाटील , कन्या संजनाताई पाटील यांच्या शुभ हस्ते या बांधकामाचे भूमिपूजन झाले होते. आज मात्र वसंत पंचमीचा मुहूर्त साधून परम पूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिलान्यास कार्यक्रम सेवेकाऱ्यांनी षोडपचार पूजन करून बांधकामाचा शुभारंभ करण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.