चिनावल येथील दारू दुकान स्थळांतरास महिलांचा विरोध ग्रामपंचायत मध्ये १९३ महिलांच्या सह्यांचे निवेदन दाखल
चिनावल येथील दारू दुकान स्थळांतरास महिलांचा विरोध
ग्रामपंचायत मध्ये १९३ महिलांच्या सह्यांचे निवेदन दाखल
लेवाजगत न्यूज चिनावल- येथे कौटुंबिक वस्तीत सुरु होणारे किरकोळ देशी दारू विक्रीचे तसेच विदेशी दारू दुकानास येथील महिलांसह परिसरातील नागरिकांनी विरोध दर्शवून घेतली आहे.या बाबदचे निवेदन आज सोमवार सकाळी १० वाजता येथील ग्रामसेवक व सरपंच यांना देण्यात आले.या निवेदनावर १९३ महिला सह पुरुषांच्या सह्या आहेत.
चिनावल येथील कुंभारखेडा रस्तावरील सर्व रहिवासी कायम कुटुंब करून रहाणारे रहिवासी असून या परिसरात आमच्या रहात्या घराच्या १०० फुट अंतराच्या आत गट नंबर ८८८ प्लॉट नंबर ११ व १२ ह्या जागेवर एकाने सदर दुकान सुरु करणेसाठी नाहरकत प्रमाणपत्राची मागणी ग्रामपंचायत कडे केली. दिनांक३१/०१/२०२२ रोजी ग्रामसभेत झालेल्या चर्चेवरून समजले परंतु यास नागरिकांनी हरकत घेतली आहे.
या परिसरातील राहिवाशी नागरिकांनी सदर दुकानामुळे आम्हास त्रास होवू शकतो तसेच कुटुंबावर तसेच लहान मुलांवर त्याचा विपरीत परिणाम होवू शकतो तसेच सदर जागेच्या बाजूला महिलांचे शौचालय
असून महिलांचा जाणे येणेचा रस्ता हा स्थलांतरित होत असलेल्या दारूच्या जागेच्या समोरूनच असल्याने ते महिलांना त्रासाचे तसेच अडचणीचे ठरू शकते परिणामी या मधून मोठा वाद उद्भवू शकतो. तसेच सदर जागेच्या परिसरात शाळा मंदिर तसेच मुस्लीम स्मशानभूमी ( कब्रस्थान ) असून सदर परिसराचे पावित्र्य पहाता या व्यक्तीस नाहरकत प्रमाणपत्र मिळण्यास आमची तीव्र हरकत आहे . असे या निवेदनात म्हटले आहे.परिस्थीचा व उद्भवणाऱ्या समस्यांचा विचार करून सदर जागेत सुरु होणारे किरकोळ देशी दारू विक्रीचे तसेच विदेशी दारू दुकान सुरु करण्यास नाहरकत प्रमाणपत्र देण्यात येवू नये असे निवेदनावर सह्या करणाऱ्या महिलांची मागणी आहे .तरी सर्व परिस्थीचा व उद्भवणाऱ्या समस्यांचा विचार करून सदर जागेत सुरु होणारे किरकोळ देशी दारू विक्रीचे तसेच विदेशी दारू दुकान सुरु करण्यास नाहरकत प्रमाणपत्र देण्यात येवू नये . निवेदनावर भावना पाटील , कल्पना भिरूड , प्रियांका भिरूड , विमलबाई अंगाडे , सविता भंगाळे , मनीषा पाटील , ललिता कंडारे , मंगला नेमाडे , लक्ष्मी कंडारे , सोनाबाई कंडारे , पद्माबाई कंडारे , छायाबाई कंडारे , कमलाबाई काळे , ज्योती कंडारे , विजया पाटील , अनिताबाई कंडारे , शिवानी कंडारे , एकता कंडारे,शिवानी कंडारे,मिनाक्षी नेमाडे,प्रतिभा भंगाळे,वंदना बोनडे,लीना वायकोळे, कल्पना पन्नासे,मालतीबाई मालखेडे, अर्चना बढे अशा जवळपास १९३ महिलांच्या स्वाक्षरीचे निवेदन देण्यात आले आहे .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत