चिनावल येथील शेतमाल चोरी , दोघांना पकडले
चिनावल येथील शेतमाल चोरी , दोघांना पकडले
लेवाजगत न्यूज चिनावल -येथील चिनावल शेतमाल चोरी प्रकरणी अखेर दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक डी.डी. इंगोले यांनी दिली .
गेल्या १५ दिवसांपासून चिनावल व परिसरात शेतमालाची चोरी करणाऱ्यांनी उच्छाद मांडला असल्याने शेतकरी हतबल आहेत . संतप्त शेतकऱ्यांनी रविवार ( दि . २७ ) रोजी सावदा येथे दोन तास रास्ता रोको आंदोलनही केले . चोरट्यांना व शेतमाल आणि साहित्याची नासधूस करणाऱ्यांना तत्काळ अटक करण्याचे आश्वासन पोलिसांनी दिले होते , त्यानुसार या परिसरातील सुमारे ४५ संशयित पोलिसांच्या ' रडार'वर आहेत . त्यांचे धरपकड सत्र पोलिसांनी सुरु केले असून त्यापैकी २ जणांना पोलिसांनी सोमवारी ताब्यात घेतले असून त्यांची सखोल चौकशी सुरु आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत