सावदा येथून २ गाई चोरट्यानी केल्या लंपास
सावदा येथून २ गाई चोरट्यानी केल्या लंपास
लेवाजगत न्यूज सावदा -येथील सावदा - फैजपूर जुन्या मार्गावर असलेल्या महावितरण कार्यालया समोरील पेपर वितरण करणारे विकास त्रंबक पाटील यांचे मालकीच्या लाल रंग असलेल्या एक गीर जातीची साधारण ५९ हजार किमतीची व दुसरी जरशी जातीची ६० हजार किमतीची अश्या एकूण १ लाख ११ हजार रुपये किमतीच्या गाई कोण्या अज्ञात चोरट्याने चोरीच्या इराद्याने लंपास केल्या. या बाबत पोलीस ठाणे येथे गुन्ह्याची नोंद करण्या साठी पाटील गेले असता दिनांक २७ रोजी शेतकऱ्याचा ताफा बंदोबस्त या ठिकाणी असल्याने नोंद होऊ शकली नसल्याचे पाटील यांनी सांगितले तसेच याच घटनास्थळा वरून दोन वर्षांपूर्वी दोन गाई लंपास झाल्या होत्या. त्याची नोंद पोलिसात आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत