मुलगा सर्पदंशाने दगावला,वडिलांच मन हेलावणारा आक्रोश,भिंतीवर डोके आपटून केला संताप व्यक्त
मुलगा सर्पदंशाने दगावला,वडिलांच मन हेलावणारा आक्रोश,भिंतीवर डोके आपटून केला संताप व्यक्त
लेवाजगत न्यूज चोपडा- तालुक्यातील बाळापूर येथे शुक्रवारी १८ फेब्रुवारी रोजी दुपारी २.३० वाजता घराजवळ फिरत असताना लहान मुलाला विषारी (कोब्रा)साप चावल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालया च्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तपासणीअंती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्या मुलास मृत घोषित केले. मुलाच्या मृत्यूच्या धक्क्याने हताश झालेल्या पित्याने रुग्णालयातच भिंतीवर डोके आपटून घेत आपला संताप व्यक्त केला. कुटुंबीयांच्या आक्रोशामुळे रुग्णालयातील नागरिकांचे मन हेलावून गेले होते.
दीपक देवसिंग पावरा (वय १५), रा. बाळापुर ता. चोपडा असे मयत मुलाचे नाव आहे. घराजवळ फिरत असताना त्याला कोब्रा सदृश्य सापाने शुक्रवारी १८ फेब्रुवारी रोजी दुपारी २.३० वाजता चावा घेतल्याने त्याच्या कुटुंबियांनी घरातील लोकांना बोलावून घेतले. त्यांनी तातडीने चोपडा ग्रामीण रुग्णालयात त्याला ३ वाजता उपचारासाठी दाखल केले.त्यानंतर जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठविले.
दरम्यान, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे संध्याकाळी ५ वाजून ४५ मिनिटांनी त्याला आणल्यानंतर दीपक यास वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रावणी हुंबे यांनी त्याला तपासून मृत घोषित केले.यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. मुलाच्या मृत्यूची वार्ता कळताच रुग्णालयाच्या कक्षातच मुलाचे पिता देवसिंग पावरा (वय ३५) यांनी धक्क्याने भिंतीवर डोके आपटून घेतले. यात त्यांच्या डोक्याला थोडी जखम झाली. कुटुंबीयांनी केलेला आक्रोश पाहता रुग्णालयातील नागरिकांचे मन हेलावून गेले होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत