Contact Banner

शेतकऱ्यांचा पोलिस ठाण्यासमोर ठिय्या-शेतमाल चोरताना हटकल्यामुळे चिनावलमध्ये तिघांना मारहाण-जखमीवर दवाखान्यात उपचार

 


शेतकऱ्यांचा पोलिस ठाण्यासमोर ठिय्या-शेतमाल चोरताना हटकल्यामुळे चिनावलमध्ये तिघांना मारहाण-जखमीवर दवाखान्यात उपचार

लेवाजगत न्यूज सावदा-चिनावल येथे १९ फेब्रुवारी रोजी  दुपारी २ वाजेच्या सुमारास सावखेडा रोडवरील डोंगर रस्त्यावर अशोक नामदेव महाजन यांचे शेताजवळील घरांमधील काही महिला बागेतील घड, तर काही बाजूच्या शेतातील हरभरा कापून नेत होत्या. केळी बागेत घड झाकणाऱ्या तुषार अशोक महाजन यांच्या लक्षात हा प्रकार येताच त्यांनी विरोध केला. मात्र, महिला व त्यांच्या सोबतच्या इतरांनी तुषारसह मंगेश विलास महाजन, निर्मल युवराज महाजन यांना बेदम मारहाण केली. त्यामुळे शेतकऱ्यांनी सावदा पोलिस ठाण्यासमोर ठिय्या मांडून कारवाईची मागणी केली.

      तुषार महाजन याने केळी घड कापणाऱ्या व हरभरा कापून नेणाऱ्या महिलांना हटकून शेतातून निघून जाण्यास सांगितले. मात्र महिलांनी हुज्जत घालून त्याला मारहाण सुरू केली. त्याच्या हाताला चावा घेवून खुरपीने हातावर वार केले. यावेळी तुषारने सोबत असलेले त्याच्या चुलत भाऊंना मदतीसाठी हाक मारली. तोपर्यंत संबंधित महिलांनी त्यांचे कुटुंबीय व शेजाऱ्यांना बोलवून तुषार, त्याचे सोबतचे मंगेश विलास महाजन व निर्मल युवराज महाजन यांना मारहाण सुरू केली. त्यात निर्मलचा हात व नाकाला जबर दुखापत झाली. मंगेश देखील जखमी झाला.

      ही माहिती मिळताच चिनावल येथील अनेक शेतकऱ्यांनी सावदा पोलिस ठाणे गाठून शेतीमाल चोरणारे व मुलांना मारहाण करणाऱ्यांवर कठोर कारवाईसाठी ठिय्या आंदोलन सुरू केले. 

      सावदा पोलिसांवर शेतकऱ्यांनी रोष व्यक्त केला. तुषार अशोक महाजन यांनी सावदा पोलिस ठाणे गाठून एपीआय देविदास इंगोले, उपनिरीक्षक राजेंद्र पवार यांना झालेला प्रकार सांगितले. नंतर तुषार, मंगेश व निर्मल महाजन यांना सावदा येथे वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले. त्यात निर्मल महाजन यांच्या हाताला दुखापत झाल्याने फैजपूर येथील डॉ. शैलेश खाचणे यांच्याकडे दाखल केले. 

       तुषार महाजन यांच्या फिर्यादीवरून सावदा येथे अनिता रामा सपकाळे, रामा शामा सपकाळे व इतर तिघांवर गुन्हा दाखल झाला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.