Header Ads

Header ADS

शेतात पाणी भरण्यासाठी गेलेल्या तरुणाने झाडाला घेतला गळफास

 


शेतात पाणी भरण्यासाठी गेलेल्या तरुणाने झाडाला घेतला गळफास

लेवाजगत न्यूज प्रतिनिधी-शेतात रात्री पाणी भरण्यासाठी गेलेल्या तरुणाने शेतातील झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी सकाळी ७ वाजता उघडकीस आली. या घटनेचे कारण स्पष्ट झाले नाही.

       नितीन शालिग्राम पाटील (वय २३, रा. वैजनाथ, ता. धरणगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. नितीन हा कुटुंबीयांसोबत वैजनाथ येथे वास्तव्यास होता. त्याचा मोठा भाऊ पुणे येथे खासगी कंपनीत नोकरीला आहे. त्यामुळे नितीन हा घरी वडिलांना शेतीकामात मदत करीत होता. शेतात रात्रीची लाइट असल्याने रविवारी रात्री नितीन शेतात पाणी भरण्यासाठी गेला होता. सोमवारी सकाळी सात वाजता नितीनचे काका भगवान पाटील हे शेतात गेले. या वेळी नितीनने झाडाला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आढळून आले. त्यांनी तत्काळ घटनेची माहिती कुटुंबीयांना दिली. त्यानंतर नितीनचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केला. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून नितीनला मृत घोषित केले. या वेळी रुग्णालयात हजर असलेल्या कुटुंबीयांनी प्रचंड आक्रोश केला.

     नितीन नेहमीप्रमाणे रात्री पाणी भरण्यासाठी गेला होता. सोमवारी सकाळी त्याला आईस रुग्णालयात घेऊन जायचे होते. त्यामुळे आईने काही वेळ त्याची वाट पाहिली. पण पाणी भरून दमलेला नितीन झोपला असेल असा समज करून आई-वडील रुग्णालयात निघून गेले. या घटनेबद्दल काही कल्पना नसताना अचानक फोनवरून नितीनच्या आत्महत्येची बातमी त्यांना मिळाली. त्यामुळे आई वडिलांना प्रचंड धक्का बसला. नितीनने आत्महत्या का केली? याचे कारण स्पष्ट झालेले नाही. नितीनच्या पश्चात आई, वडील, मोठा भाऊ, विवाहित बहीण असा परिवार आहे. शनिपेठ पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.