अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुण ठार महामार्गावर मध्यरात्री अपघात
अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुण ठार महामार्गावर मध्यरात्री अपघात
लेवाजगत न्यूज जळगाव- गावावरून जळगाव शहरात येत असताना अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत सागर विजय राणे (वय ३० रा. हिंगोणा, ता. यावल) हा तरुण ठार झाला आहे. हा अपघात २७ रोजी रात्री साडे बारा वाजता जळगाव-भुसावळ महामार्गावर असलेल्या बुलेट शोरुम समोर झाला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात वाहनधारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर हा कामाच्या निमित्ताने शहरातच वास्तव्याला होता. २६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी तो दुचाकीने हिंगोणा येथे घरी गेला होता. त्यानंतर २७ फेब्रुवारी रोजी जळगावला दुचाकीने परत येत असताना मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास जळगाव-भुसावळ मार्गावरील बुलेट शोरुमच्या समोरच अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत सागर हा तरुण जागीच ठार झाला. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयात सागरला डॉक्टरांनी मृत घोषीत केले. सागरच्या पश्चात पत्नी पल्लवी, आई चारुलता, वडील विजय वासुदेव राणे असा परिवार आहे.
एकुलता मुलगा गेला
राणे दाम्पत्याला सागर हा एकुलता मुलगा होता. या घटनेने राणे कुटूंबासह गावकऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. शरद रमेश जावळे (वय ४६, रा. रोझोदा ता. रावेर) यांच्या , फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनधारकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपनिरीक्षक नीलेश गोसावी करीत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत