कोरोनाने पतीचा मृत्यू, राक्षसी दिराचं किळसवाणं कृत्य, संतापजनक घटना
कोरोनाने पतीचा मृत्यू, राक्षसी दिराचं किळसवाणं कृत्य, संतापजनक घटना
लेवाजगत न्यूज जळगाव :- राज्यात महिला अत्याचाराच्या घटना काही केल्या कमी होताना दिसत नाहीय. विशेष म्हणजे महिला स्वत:च्या घरात सुरक्षित आहेत का ?
असा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. कारण जळगाव जिल्ह्यात तशीच काहिशी घटना समोर आली आहे. एका महिलेच्या पतीचं करोनामुळे निधन झालं आहे. तिला एक लहान मुलगी देखील आहे. या महिलेचं वय अवघं २४ वर्षे इतकं आहे. त्यामुळे आरोपीने तिला लग्नाचे आमिष दाखवत तिची फसवणूक केली. आरोपीने तिच्यावर अत्याचार केला. तसेच तिच्या मृतक पतीच्या बँक खात्यातील पैसे उकळले. आपली फसवणूक झाल्याचं समजल्यानंतर महिलेने अखेर पोलिसात धाव घेतली.
काय नेमकं प्रकरण ?
पाचोरा तालुक्यातील एका गावातील २४ वर्षीय विधवा महिलेला लग्नाचे आमिष दाखवून चुलत दिराने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपीने अत्याचार तर केलाच, त्यासोबत ७३लाख ६४हजार ५०१ रुपये आणि सोन्याचे दागिने घेवून महिलेची फसवणूक केली आहे. याप्रकरणी मंगळवारी (१ मार्च) रात्री पाचोरा पोलीस ठाण्यात चुलत दीर आणि सासरे यांच्यासह तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहितीनुसार, २४ वर्षीय महिलेच्या पतीचा २०२० मध्ये करोनाने मृत्यू झाला होता. पीडित महिलेचा पती आयटी इंजिनिअर होता. दरम्यान, पतीच्या मुत्यूनंतर चुलत दीर आणि सासू, सासऱ्याने फसवणूक करण्याचा कट रचला. त्यांनी संगनमताने महिलेच्या आई-वडिलांकडे माहेरी जाऊ दिले नाही. तसेच महिलेला तिच्या चुलत दीरासोबत लग्नाचे आमीष दाखविले. पीडीता लग्नानंतर शारिरीक संबंध ठेवू असे सांगत असताना देखील वेळोवेळी शारिरीक संबंध ठेवून चुलत दिराने महिलेवर बलात्कार केला. तसेच अद्यापपर्यंत लग्न केले नाही व लग्नासही नकार दिला.
चुलत सासरे व दिर अशा तिघांनी मिळून महिलेचा विश्वास संपादन करुन वेगवेगळे बहाने करुन महिलेच्या पतीच्या खात्यातील ७३ लाख ६४ हजार ५०१रुपये वळती करुन घेतले. एवढेच नाहीतर महिलेच्या मुलीचे ११२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने सुद्धा ठेवून घेतले. याप्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरुन पाचोरा पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक किसन सज्जनराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विकास पाटील करीत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत