पठाणकोट’मधून कडुनिंबाच्या पाल्याचे ४० गाठोडे जप्त
पठाणकोट’मधून कडुनिंबाच्या पाल्याचे ४० गाठोडे जप्त
लेवाजगत न्यूज सावदा- रावेरकडून येणाऱ्या पठाणकोट एक्स्प्रेसच्या प्रवासी डब्यातून कडूनिंबाच्या झाडाचा पाला मुंबईकडे वाहून नेणे सुरू होते. ही माहिती मिळताच एडीआरएम रूखमय्या मीणा यांनी भुसावळ जंक्शनवर आरपीएफच्या मदतीने पाल्याचे ४० गाठोडे जप्त केले.
रावेर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून शेतीमाल चोरीच्या घटना वाढल्या आहेत. चोरीचा हा शेतीमाल रेल्वेतून मुंबईकडे वाहून नेला जातो, अशी शेतकऱ्यांची ओरड आहे. त्याची दखल घेत रेल्वेने कारवाईचे आश्वासन दिले होते. त्यानुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आरपीएफला सूचना दिल्या आहेत. त्यासाठी सोमवार ,मंगळवारी दोन दिवस भुसावळ स्थानकावर गाड्यांची तपासणी सुरू आहे. दरम्यान, रावेर कडून येणाऱ्या पठाणकोट एक्स्प्रेसमधून काही गाठोडे मुंबईकडे वाहून नेले जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार भुसावळात तपासणी करताच प्रवासी डब्यामध्ये ठेवलेले कडूनिंबाच्या पाल्याचे ४० गाठोडे जप्त केले. सावदा, रावेर, निंभोरा येथील महिला-पुरूष या पाल्याची वाहतूक करत होते. संबंधितांकडून प्रत्येकी एक हजार रूपये दंड वसूल करण्यात आला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत