स्पा सेंटरमध्ये काम करणाऱ्या तरुणीवर मालकाचा अत्याचार
स्पा सेंटरमध्ये काम करणाऱ्या तरुणीवर मालकाचा अत्याचार
वृत्तसंस्था जळगाव - शहरातील एका स्पा सेंटरवर काम करणाऱ्या २८ वर्षीय तरुणीवर मालकाने अत्याचार, २ व्यवस्थापकांनी विनयभंग केला. ही घटना २४ फेब्रुवारी रोजी घडली.
पीडित तरुणी हरियाणा राज्यातील रहिवासी असून पतीपासून विभक्त राहत असल्याने नोकरीच्या निमित्ताने सन २०२१मध्ये ती जळगावात आली. रिंगरोडवरील सी सल्ट स्पा सेंटरवर नोव्हेंबर २०२१मध्ये ती नोकरीला लागली आहे. २४ फेब्रुवारी रोजी स्पाचा मालक दत्तू लक्ष्मण माने (रा. नाशिक) हा जळगावी आला होता.
त्याने पीडित महिलेकडून मसाज करून घेतल्यानंतर अत्याचार केला. तर स्पाचे व्यवस्थापक दीपक बडगुजर आणि पंकज जैन यांनीही पीडित महिलेचा विनयभंग केला. त्यानंतर पीडितेला कामावरून काढून टाकले. याप्रकरणी पीडित महिलेने जिल्हापेठ पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार माने, दीपक बडगुजर व पंकज जैन या तिघांच्या विरुद्ध जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलिस निरीक्षक किशोर पवार तपास करीत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत