महिला पोलिसाचा विनयभंग करणाऱ्याची येथेच्छ धुलाई
महिला पोलिसाचा विनयभंग करणाऱ्याची येथेच्छ धुलाई
लेवाजगत न्यूज जळगाव - शहरातील नेरी नाका येथे कर्तव्यावर असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याशी धक्काबुक्की करून विनयभंग व धमकी देणाऱ्या व्यक्तीला गर्दीतील नागरीकांकडून चोप दिल्याचा घटना गुरुवारी घडली आहे. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहर वाहतूक शाखेच्या महिला पोलीस कर्मचारी ह्या गुरूवारी शहरातील नेरी नाका येथे वाहतूक नियंत्रण करण्यासाठी कर्तव्य बजावीत होत्या. सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास संशयित आरोपी सलीमखान आरमानखान पठाण (वय-५१) रा. पाळधी ता. धरणगाव हा महिला पोलीस कर्मचारी यांच्याकडे आला व मनीषा मॅडमचा मोबाईल नंबर द्या असे सांगितले. आपल्याकडे मनीषा मॅडमचा मोबाईल नंबर नसल्याचे महिलेने सांगितले. याचा राग आल्याने सलीमखान हा महिला पोलीसाच्या अंगावर धावून आला. आणि मी रिपोर्टर आहे, मी तुझी नोकरी घालवतो, तुझा साहेब मला सलाम करीन अशी धमकी दिली. कर्तव्यावर असलेल्या महिला पोलीस कर्मचारीचा हात पकडून तसेच तिचा मोबाइलमध्ये फोटो काढल्यावरुन गोंधळ निर्माण झाला. याबाबत महिला पोलिस कर्मचारी यांनी शनिपेठ पोलिस ठाण्यात फोनकरून पोलीस कर्मचाऱ्यांना बोलावून घेतले. यावेळी शनिपेठ पोलिस ठाण्याचे पोहेकॉ सविता परदेशी, पो. कॉ. किरण मराठे, पोकॉ. रतिलाल पावरा, पो.कॉ. राहुल पाटील यांनी धाव घेतली. त्यावेळी त्या इसमाला ताब्यात घेतले. ताब्यात घेण्यापूर्वी या ठिकाणी उपस्थित असलेल्या काही नागरीकांकडून त्याला चांगला चोप देण्यात आला. याबाबत शनिपेठ पोलिस ठाण्यात संशयित आरोपी सलीम खान आरमानखान पठाण (वय ५१) राहणार पाळधी तालुका धरणगाव याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शनिपेठ पोलिस कर्मचारी करीत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत