नारीशक्तीला सलाम – डॉ. सुमाया रेश्मा
नारीशक्तीला सलाम – डॉ. सुमाया रेश्मा
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : दंतसौंदर्य शास्त्रातील एक तज्ज्ञ असा लौकिक असूनही फॅशन विश्वात तितक्यात प्रभावीपणे सौंदर्याची परिभाषा निर्माण करणार्या सुमाया रेश्मा यांचे कार्य वाखाखण्याजोगे आहे. आपल्या कार्याचा ठसा त्यांनी उमटवला असून जागतिक महिला दिनाच्या औचित्यावर त्यांचे कार्य जाणून घेणे नक्कीच इतर महिलांनादेखील प्रेरणादायी आहे. आपल्या व्यवसायातून वेळ काढून त्यांनी फॅशनचा छंद जोपासला आहे. त्या माध्यमातून आज मोठ्मोठ्या ब्रॅण्डसाठी त्या महत्वाचे मॉडेल ठरल्या आहेत. एवढे करूनही त्या समाजाप्रती असलेली आपली बांधिलकी अधिक घट्ट ठेवत स्वयंसेवी संस्थांसाठीही कार्य करत आहेत.
गेल्या दशकाहून अधिक काळ त्या दंत वैद्यक म्हणून कार्यरत आहेत. त्याशिवाय फॅशन मॉडेल, सामाजिक कार्यकर्ती अशीही त्यांची ओळख आहे. वेस्टसाईड, मॅक, झारा, मॅक्स, उरबंसारी, इथनिकडागा, चिकनकरिगर, डॅझल डायमंड, रनवे मॉडेल, इकोब्रॅण्ड कॉस्मेटिक्स, महिस्मती इथनिक वेअर, प्रिटी लेडी अशा ब्रॅण्डसाठीही त्यांनी काम केले आहे. एक उडान, स्त्रीशक्ती, रोटीदान, आरोग्य या स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून त्यांचे सामाजिक कार्यदेखील सुरु आहे. दारिद्र्यरेषेखालील अनाथ मुलांसाठीही त्या कार्य करत आहेत.
त्यांच्या कार्याबद्दल त्यांना भारतरत्न मौलाना अब्दुल कलाम आझाद पुरस्कार, नारीसन्मान पुरस्कार, डेंटल पर एक्सलेन्स, इंडियन डेंटल असोसिएशनचे बेस्ट स्माईल अवार्ड, ग्लोबल स्टायल स्टेटमेंट, एशियन यंगेस्ट, दादासाहेब फाळके इंडियन टेलिव्हिजन पुरस्कार, पनाचे इमेज, महात्मा गांधी ग्लोबल एम्बॅसॅडर, एन्फ्लुएन्सर, गोल्डन वुमन अचिवर, स्त्रीशक्ती, आंतरराष्ट्रीय मानवी आयोग, एशियन इंटरनॅशनल एक्सलेन्स असे अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. या पुरस्काराची यादी फार मोठी आहे.
गरजूंना मोफत दंत चिकित्सा तसेच शस्त्रक्रिया त्या करून देतात. आतापर्यंत त्याची संख्य हजारोंनी झाली आहे. महिलांचे स्तनपान, सॅनिटरी पॅड या चळवळीशीही त्या संबंधित आहेत. कोरोना काळातही त्यांनी समाजासाठी कार्य केले आहे. अनेक सौंदर्य प्रतियोगिताचे ज्युरी तसेच सिलेब्रिटी गेस्ट म्हणूनही त्यांना आमंत्रित करण्यात येते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत