Header Ads

Header ADS

सह्याद्री प्रतिष्ठान मुंबई तर्फे मोफत लाठी काठी प्रशिक्षण शिबीर जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीला महिलांसाठी खास प्रशिक्षण

 

सह्याद्री प्रतिष्ठान मुंबई तर्फे मोफत लाठी काठी प्रशिक्षण शिबीर



जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीला महिलांसाठी खास प्रशिक्षण



मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : किल्ले शिवडी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शेकडो भक्तांच्या  उपस्थितीमध्ये सह्याद्री प्रतिष्ठान मुंबई तर्फे मोफत लाठी काठी प्रशिक्षण शिबीर यशस्वीरित्या पार पडले. जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीला महिलांसाठी खास प्रशिक्षण देण्यात आले.

कार्यक्रमात ५० महिला व लहान बालिकांना लाठी काठीचे प्रशिक्षण देण्यात आले. त्याचा सराव कायम ठेवण्यासाठी आवाहन केले.

संकटाशी दोन हात करताना स्त्रियांनाही धैर्याने लढता यावे आणि आत्मसंरक्षण करता यावे हा प्रामाणिक हेतू डोळ्यासमोर ठेऊन प्रशिक्षण शिबीर घेण्यात आले होते.

सह्याद्री प्रतिष्ठानच्या सदस्य व नुकत्याच राष्ट्रीय स्पर्धेत रौप्य पदक प्राप्त केलेल्या राष्ट्रीय लाठी खेळाडू लीना हिर्लेकर यांचे अनमोल मार्गदर्शन उपस्थितांना लाभले.

सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नरवीर तानाजी मालुसरे यांच्या वंशज

डॉ. शीतल मालुसरे यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांनी सोबत आणलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी तानाजी मालुसरेंना अर्पण केलेल्या कवड्याच्या माळेचे दर्शन सर्वांना घेता आले.

बृहन्मुंबई महानगरपालिका स्थापत्य समिती अध्यक्ष (शहर) दत्ताराम पोंगडे, स्थानिक शिवसेना नगरसेवक सचिन पडवळ, सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त रक्षा रामकृष्ण महाराव, भारतीय पॉवर लिफ्टर खेळाडू किरण सणस, पत्रलेखक राजन देसाई यांची उपस्थिती लाभली.

त्यात प्रामुख्याने महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय पॉवरलिफ्टर, पॉवरलिफ्टिंग व बेंचप्रेस या क्रीडा प्रकारात उत्कृष्ट कामगिरी बाबत दोन वेळा महाराष्ट्र शासनाने "शिव छत्रपती" क्रीडा पुरस्काराने सन्मानित केलेल्या रक्षा महाराव यांचे मार्गदर्शन लाभले.

सदर कार्यक्रमाचा समारोप सह्याद्री प्रतिष्ठानचे सदस्य पोलीस अधिकारी शाहीर प्रविण फणसे व बालशाहीर शर्वरी फणसे यांच्या पहाडी आवाजात महिला दिनविशेष पोवाडा गाऊन करण्यात आली.

सह्याद्री प्रतिष्ठान मुंबई व जवळपासच्या जिल्ह्यातून आलेल्या शेकडो दुर्गसेवक व खासकरुन दुर्गसेविका यांची उपस्थिती, नियोजन, शिस्त उल्लेखनीय होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.