Header Ads

Header ADS

शिक्षकाने केला १२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार


 शिक्षकाने केला १२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार

भुसावळ प्रतिनिधी - शहरातील एका भागात राहणाऱ्या ७५ वर्षीय शिक्षकाने १२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पीडित मुलीला ट्युशनला बोलवून नराधमाने अत्याचार केलाय. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात जयंत रायन (वय ७५) या नराधमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.


यासंदर्भात अधिक असे की, दि. ६ मार्च २०२२ रोजी दुपारच्या सुमारास पीडित १२ वर्षीय मुलगी दुपारी २ वाजता टयुशनला गेली. तेव्हा टयुशनमध्ये कोणीही नव्हते. तेव्हा जयंत रायन (वय ७५, रा.भुसावळ) याने पिडीत मुलीला म्हणाला की, तु मला परत हग दे, तेव्हा पिडीत मुलगी आरोपी जवळ गेली तेवढ्यात त्यांनी पिडीत मुलीला जवळ ओढले व बेडवर झोपविले. यानंतर आरोपीने पिडीत मुलीला सोडले. त्यांनतर पिडीत मुलगी घरी निघून गेली. यानंतर घडलेला सगळा प्रकार पीडितेने तिच्या आईला सांगितला. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात भाग ५ सीसीटीएनएस गुरंन १४१/२०२२ भादंवि ३७६

(अ.ब) ३७६, (३) सह बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ४,६ प्रमाणे जयंत रायन या नराधमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सपोनि मंगेश गोंटला हे करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.